esakal | सोनगीर ग्रामपंचायतीवर आताही महिलाराज; नऊ जागांवर महिलांसाठी
sakal

बोलून बातमी शोधा

women reservation

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुकांनी मतदारांच्या गाठीभेटीसह कागदपत्रांची जमवाजमव सुरू केली आहे. घरपट्टी, नळपट्टी थकबाकीचे रविवारपर्यंत ग्रामपंचायतीत ५० हजार रुपये जमा झाले होते.

सोनगीर ग्रामपंचायतीवर आताही महिलाराज; नऊ जागांवर महिलांसाठी

sakal_logo
By
एल. बी. चौधरी

सोनगीर (धुळे) : येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सहा प्रभागांतील सदस्यांच्या १७ जागांसाठी इच्छुकांची भाऊगर्दी दिसून येत असून, नऊ जागांवर महिला, तीन जागी पुरुष आरक्षण आहे. उर्वरित पाच जागा सर्वसाधारण असून, तेथे महिलांनाही संधी आहे. सरपंच आरक्षण काहीही निघो. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही महिलाराज राहील, हे स्पष्ट आहे. 
दरम्यान, पंचायत समितीचे तीन आजी-माजी सदस्य पॅनल देण्याचा प्रयत्न करीत आहेत. 
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुकांनी मतदारांच्या गाठीभेटीसह कागदपत्रांची जमवाजमव सुरू केली आहे. घरपट्टी, नळपट्टी थकबाकीचे रविवारपर्यंत ग्रामपंचायतीत ५० हजार रुपये जमा झाले होते. पंचायत समिती सदस्य चेतन चौधरी, माजी सदस्य अविनाश महाजन पूर्ण पॅनल देणार असून, पंचायत समितीच्या माजी सदस्या रूपाली माळी दोन प्रभागांत पॅनल देत आहेत. 
प्रभाग एकमध्ये भीमा भिल, पिंटू पवार, नारायण भिल, जयवंताबाई भिल, रुख्माबाई भिल (ठाकरे), लखन ठेलारी, प्रवीण भोई व अन्य इच्छुक असून, प्रभाग दोनमध्ये कीर्ती गुजर, ज्योती पाटील, वैशाली माळी, द्वारकाबाई माळी, रूपाबाई परदेशी, सविता पाटील, अविनाश महाजन, मनुकुमार पटेल, संदीप गुजर, प्रभाग तीनमध्ये अनिता जाधव, विमलबाई पावनकर, रंजनाताई चौधरी, राजेंद्र चौधरी, डॉ. राहुल देशमुख, प्रभाग चारमध्ये द्वारकाबाई माळी, शमीमबानो हसनखॉं पठाण, हमिदाबी बशीर पठाण, आरीफखॉं रऊफ पठाण, हमजा जुझरहुसेन बोहरी, जितेंद्र बागूल, नंदू धनगर, युवराज माळी, गोकुळ माळी, हेमंत चव्हाण, हसनखॉं पठाण, शफीयोद्दीन पठाण, शेख अजीम शेख मुनाफ, बशीरखॉं गुलाबखॉं पठाण, राजेश चौधरी, प्रभाग पाचमध्ये सुमन माळी, दीपमाला सैंदाणे, दीपाली कासार, मनीषा कासार, विशाल कासार, अनिल कासार, नितीन निझर, अनिल माळी, साहेबराव माळी, प्रभाग सहामध्ये शोभाबाई मोरे, सविता मोरे, देवकन्या मोरे, लताबाई अहिरे, प्रमोद धनगर, योगेश माळी, जितेंद्र अहिरे, अंकित कासार, रोहिदास भिल, संजय मुळे, शेख इरफान शेख इक्बाल कुरेशी, सद्दामखॉं जब्बारखॉं कसाई, अब्दुल हमीद अमीर कसाई आदी इच्छुक आहेत. 
 
संपादन ः राजेश सोनवणे