
ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत तब्बल 28 उमेदवारांवर डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढवली. त्यात निजामपूरच्या 25, तर जैताणेच्या 3 उमेदवारांचा समावेश आहे.
निजामपूर (धुळे) : नुकत्याच जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालात साक्री तालुक्यातील निजामपूर व जैताणे या दोन्ही सतरा सदस्यीय ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत तब्बल 28 उमेदवारांवर डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढवली. त्यात निजामपूरच्या 25, तर जैताणेच्या 3 उमेदवारांचा समावेश आहे.
निजामपूरला 17 जागांसाठी सर्वात जास्त 59 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यातील 17 विजयी उमेदवार व 17 प्रतिस्पर्धी उमेदवार वगळता विविध वॉर्डांतील सुमारे 25 उमेदवारांवर डिपॉझिट जप्त झाले. तर जैताणेत 17 पैकी 7 जागा बिनविरोध निवडून आल्या असून उर्वरित 10 जागांसाठी 22 उमेदवार निवडणूक रिंगणात होते, त्यापैकी 3 उमेदवारांवर डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढवली आहे.
डिपॉझिट जप्त झालेले उमेदवार (कंसात मिळालेली मते)
निजामपूर ग्रामपंचायत : सुनील बागले (5), भिला माळचे (16), पावबा सोनवणे (14), सपना मोरे (16), तांबोळी शेख गणी (35), युसूफ सय्यद (5), इंदूबाई पवार (66), ताहीर मिर्झा (15), अंजनाबाई सोनवणे (40), मुश्ताक पठाण (6), युसूफ सय्यद (1), चिंधु सोनवणे (4), वर्षा जाधव (74), वंदना मोहने (88), मुश्ताक पठाण (24), रवींद्र मोरे (6), चिंधु सोनवणे (1), नोटा (26), दगडू पाटील (6), ताहीर मिर्झा (2), मुश्ताक पठाण (12), सलीम पठाण (40), भूषण पाटील (14), युसूफ सय्यद (1), दिलनूरबी सय्यद (5), अंजनाबाई सोनवणे (3).
जैताणे ग्रामपंचायत - तनुजा जाधव (37), नामदेव पिंपळे (105), राहुल महिरे (105)
‘नोटा’ अधिक प्रभावी
निजामपूरला एकूण 6 हजार 172 मतदारांपैकी 4 हजार 178 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर जैताणेत वॉर्ड क्रमांक पाचमधील तिन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याने 1 हजार 466 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला नाही. उर्वरित पाच वॉर्डांतील एकूण 8 हजार 139 मतदारांपैकी 5 हजार 719 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. निजामपूरला 373, तर जैताणेत 383 अशा एकूण 756 मतदारांनी नोटाला मतदान केले.
संपादन ः राजेश सोनवणे