Gram Panchayat Election धुळे तालुक्‍यात भाजपला दणका; शिरपूर तालुक्‍यात पटेलांचे वर्चस्‍व कायम

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 January 2021

धुळे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपसह अन्य पक्षांनी मतदारसंघात गड कायम राखले. धुळे जिल्ह्यात २१८ ग्रामपंचायतींपैकी ३७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने १८१ ग्रामपंचायतीसाठी ७७ टक्के मतदान झाले होते. 

धुळे : धुळे तालुक्‍यामध्ये भाजपला धोबीपछाड करत महाविकास आघाडीने आपले वर्चस्‍व कायम राखले आहे. आमदार कुणाल पाटील यांची प्रतिष्‍ठा पणाला लागली असताना तालुक्‍यातील ९० टक्के ग्रामपंचायतीवर काँग्रेसने वर्चस्व कायम ठेवले. पण शिरपूर तालुक्‍यात अमरीश पटेल यांनी विजयी झेंडा कायम राखला आहे.

धुळे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपसह अन्य पक्षांनी मतदारसंघात गड कायम राखले. धुळे जिल्ह्यात २१८ ग्रामपंचायतींपैकी ३७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने १८१ ग्रामपंचायतीसाठी ७७ टक्के मतदान झाले होते. 

शिंदखेडा तालुक्‍यात भाजपचा झेंडा
ग्रामपंचायत निवडणुकीचा सोमवारी निकाल जाहीर करण्यात आला, यावेळी शिंदखेडा तालुक्यात ६७ ग्रामपंचायतींपैकी ५६ ग्रामपंचायतींवर भाजपने सत्ता प्राप्त केली असून धुळे तालुक्यात ९० टक्के जागांवर काँग्रेसने यश प्राप्त केले आहे. 

अमरीश पटेल यांचे वर्चस्‍व कायम
शिरपूर तालुक्यामध्ये ३४ ग्रामपंचायतींपैकी सहा ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्यानंतर २८ ग्रामपंचायती साठी निवडणुका पार पडल्या या सर्वच्या सर्व ग्रामपंचायतींवरती भाजप हे वर्चस्व राहिले असून शिरपूर तालुक्यातील ग्रामपंचायतींवर भाजपा म्हणजेच माजी मंत्री तथा विधानपरिषद सदस्य अमरीश भाई पटेल यांचं वर्चस्व कायम राहिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news gram panchayat election result mla kunal patil amrish patel