
मतमोजणीसाठी १६ टेबल ठेवले असून एका टेबलवर तीन कर्मचारी असे एकूण ४८ कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्याची माहिती निवडणूक शाखेने दिली. प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र टेबल राहणार आहे.
चिमठाणे (धुळे) : शिंदखेडा तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतच्या निवडणुकीची मतमोजणी तहसील कार्यालयाच्या मुख्य इमारतीत सोमवारी (ता.१८) सकाळी दहाला सुरवात होऊन तीन फेऱ्या होतील. प्रत्येक फेरीत १६ ग्रामपंचायतीची मतमोजणी होणार आहे. शिंदखेडा तालुक्यात १६ ग्रामपंचायतीची मतमोजणी पूर्ण झाल्यावर दुसऱ्या फेरीच्या १६ गावांची मतमोजणी होईल, याचप्रमाणे तिसऱ्या फेरीची मतमोजणी होणार आहे.
मतमोजणीसाठी १६ टेबल ठेवले असून एका टेबलवर तीन कर्मचारी असे एकूण ४८ कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्याची माहिती निवडणूक शाखेने दिली. प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र टेबल राहणार आहे. यात पहिल्या फेरीत सोनेवाडी, दरखेडा, सोनशेलू, विखुर्ले, सार्वे, हातनूर, दत्ताने, निरगुडी, अमराळे, लोहगाव - वसमाणे, लंघाणे, पढावद, तावखेडा (प्र.नंदुरबार), विरदेल, डाबली व सुराय गृप ग्रामपंचायत या सोळा गामपंचयाची मतमोजणी होईल. दुसऱ्या फेरीत रहिमपुरे, खलाणे, वरूळ- घुसरे, धमाणे, सवाई- मुकटी, बाम्हणे, अंजदे खुर्द, तामथरे, जसाने, अजंदे बुद्रुक, जुने कोळदे, कर्ले, झिरवे, दलवाडे (प्र.नंदुरबार), बेटावद व चिमठावळ या ग्रामपंचयातीचा समावेश आहे. तिसऱ्या फेरीत कामपूर, जातोडे, रेवाडी, वायपूर, जखाणे, सुलवाडे, सुकवद, डांगुणे - सोडले, रंजाणे, नवे कोळदे, परसोळे, धावडे, मुडावद, भिलाणे- दिगर, अक्कडसे, मेलाणे व मंदाणे या सोळा ग्रामपंचायतीची मतमोजणी होणार आहे.
एका फेरीसाठी एक तास
मतमोजणीची प्रशासनाने संपुर्ण तयारी पूर्ण केली आहे. १५० प्रभागांचे १५० ईव्हीएम मशीन मतदानानंतर तहसिल कार्यालयात अभिलेख कक्षाच्या बाजूच्या खोलीत स्ट्रॉंग रूम बनवित या ठिकाणी ठेवले आहेत. या ठिकाणी एसआरपीचा २४ तास खडा पाहरा आहे. मतमोजणी केंद्रावर पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त लावला आहे. मतमोजणीच्या एका फेरीसाठी अंदाजे एक तास लागण्याची शक्यता असुन संपुर्ण मतमोजणी अडीच तासात संपण्याची शक्यता निवासी नायब तहसीलदार बन्सिलाल वाडीले, अव्वल कारकुन संजय राणे व लिपिक दिपक माळी यांनी व्यक्त केली.
ओळखपत्रांसाठी एकच गर्दी
उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनीधींनी ओळखपत्र तयार करण्यासाठी रविवारी (ता.१७) एकच गर्दी केली होती. मतमोजणी केंद्रात उमेदवार किंवा त्याच्या एका मतमोजणी प्रतिनीधीला प्रवेश दिला जाणार आहे. यावेळी मतमोजणी प्रतिनीधींना ओळखपत्र दिले. यासाठी सकाळपासून तहसिल कार्यालयातील चार कर्मचाऱ्यांची नियक्ती केली असुन ओळखपत्र बनवुन देण्यात येत आहे.
संपादन ः राजेश सोनवणे