
शिंदखेडा तालुक्यातील सुराय, सोनशेलू व नवे कोडदे येथील ईश्वर चिठ्ठीमुळे प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाले.
चिमठाणे (धुळे) : शिंदखेडा तालुक्यातील सुराय, सोनशेलू व नवे कोडदे येथील ईश्वर चिठ्ठीमुळे प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाले. ईश्वर चिठ्ठी काढणाऱ्या सायली शिंपीला बक्षीस म्हणून तीन उमेदवारांनी अडीच हजार रूपये दिले.
सोनशेलू ग्रामपंचायतीचे उमेदवार कमलबाई नानाभाऊ गिरासे व रत्ना मनोहर म्हसदे या दोघांना 164 अशी सारखे मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठीद्वारे उमेदवाराला विजयी करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार बालवाडीतील सायली शिंपी हिच्या हाताने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. यात रत्ना म्हसदे यांची चिठ्ठी निघल्याने त्या निवडून आल्याचे तहसीलदार सुनील सैदाणे यांनी जाहीर केले.
पुन्हा दोन ईश्वर चिठ्ठी
सुराय- अक्लकोस गृप ग्रामपंचायतीच्या उमेदवार न्हानजी ओंकार चव्हाण व भिमसिंह अंबरसिंह ठाकरे यांना देखील 258 मते मिळाली. दोघाही उमेदवारांना सारखे मते मिळाल्याने पुन्हा सायली शिंपी हिने काढलेल्या ईश्वर चिठ्ठीत न्हानजी चव्हाण विजयी झाले. नवे कोडदे ग्रामपंचायतीच्या निवडणूक ही पूनम प्रविण गिरासे यांना 87 मते तर त्यांचे प्रतिस्पर्धी प्रमिला राजेंद्र रामराजे यांना 87 अशी सारखे मते मिळाल्याने सायली शिंपी हीने काढलेल्या ईश्वर चिठ्ठीद्वारे पूनम गिरासे विजयी झाल्या.
संपादन ः राजेश सोनवणे