महिला सरपंचपदासाठी आरक्षणाची सोडत; धुळ्यात सोमवारी प्रक्रिया

निखील सुर्यवंशी
Friday, 29 January 2021

एक फेब्रुवारीला सकाळी अकराला धुळे ग्रामीण तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढली जाईल, अशी माहिती तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी गायत्री सैंदाणे यांनी दिली. 

धुळे : धुळे तालुक्यातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायती वगळून इतर सर्व ग्रामपंचायतींसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी महिला सरपंचपदाचे आरक्षण निश्चित होणार आहे. त्यासाठी एक फेब्रुवारीला सकाळी अकराला धुळे ग्रामीण तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढली जाईल, अशी माहिती तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी गायत्री सैंदाणे यांनी दिली. 

सोडतीतील गावांची नावे अशी : अजंग/कासविहीर, अजनाळे, अनकवाडी, अंचाळे, आर्वी, अकलाड, आमदड/ वजीरखेडे, आर्णी, आंबोडे, इसरणे, उभंड, उडाणे, कापडणे, काळखेडे, कावठी, कुळथे, कुंडाणे (वरखेडी), कुंडाणे (वार), कुसुंबा, कुंडाणे (वेल्हाणे), वेल्हाणे, कौठळ, खेडे/सुट्रेपाडा, खोरदड, खंडलाय खुर्द, खंडलाय बुद्रूक, बांबुर्ले प्र. नेर, गरताड, गोताणे, गोंदूर, चिंचखेडे, चिंचवार, चांदे, चौगाव/हिंगणे, जुनवणे, जापी, जुन्नेर, तरवाडे, तिखी, मोरदडतांडा, अंचाळेतांडा, दह्याणे, दापुरा/दापुरी, देवभाने, देऊर बुद्रूक, दोंदवाड, देऊर खुर्द, धनुर/लोणकुटे, धमाणे/धमाणी/धोडी, धामणगाव, धाडरा, धाडरी, नरव्हाळ, नगाव/तिसगाव/वडेल/ढंढाणे, नवलाणे, नाणे, नावरा- नावरी, निमडाळे, न्याहळोद, निकुंभे नेर/म. पांढरी, निमगूळ, नंदाळे खुर्द नांद्रे/पुनितपाडा, नंदाणे, पाडळदे, 
पिंपरखेडे, पुरमेपाडा, फागणे, बल्हाणे, बाबरे, बाभुळवाडी, बिलाडी, बुरझड, बेहेड, बोरसुले/नवेकाठारे, बेंद्रेपाडा, बोरीस, बोदगाव/वणी खुर्द, बोरविहीर, बोरकुंड, होरपाडा, रतनपुरा, भदाणे, भिरडाणे/भिरडाई, मळाणे, मुकटी, मेहेरगाव, मोरदड, मोराणे प्र.नेर, मोहाडी प्र.डा., मोरशेवडी, मोघण, मांडळ, रामी, रावेर, रानमळा, लळिंग/दिवाणमळा, लामकाणी, लोहगड, लोणखडी, वडणे, वडजाई, वणी बुद्रूक, वडगाव, वार, विश्वनाथ/सुकवड, विंचूर, वेल्हाणे बुद्रूक, शिरुड, शिरधाणे प्र. नेर, शिरधाणे प्र. डा, सडगाव/हेंकळवाडी, सरवड, सावळदे, 
सावळी/सावळीतांडा, सायने, सातरणे, सांजोरी, सिताणे, सैताळे, सोनगीर, सौंदाणे, सोनेवाडी, हडसुणी, हेंद्रूण, हेंकळवाडी/तामसवाडी, तांडा (कुंडाणे), नवलनगर, निमखेडी. तालुक्यातील सर्व पक्षप्रमुख, स्थानिक स्वराज्य सस्थांचे सदस्य, पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्यांना उपस्थितीचे आवाहन तहसीलदार सैंदाणे यांनी केले. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news gram panchayat women sarpanach reserve seat