esakal | दादा भुसेंनी झोपडीत घेतली खिचडीचा आस्‍वाद अन्‌ आदिवासींसोबत वाढदिवस
sakal

बोलून बातमी शोधा

dada bhuse

बारीपाडा (ता. साक्री) येथे कृषिमंत्री दादा भुसे यांनी आदिवासी बांधव व शेतकऱ्यांसमवेत वाढदिवस साजरा केला.

दादा भुसेंनी झोपडीत घेतली खिचडीचा आस्‍वाद अन्‌ आदिवासींसोबत वाढदिवस

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपळनेर (धुळे) : जे बाजारात विकले जाते, तेच शेतकऱ्यांनी पिकवावे, त्यातून शेतकऱ्यांना जास्तीचे दोन पैसे मिळतील. तसेच बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेच्या माध्यमातून कंपन्यांसाठी गोडावून बांधणे, कोल्ड स्टोरेज बांधने, प्रक्रिया उद्योग करणे आणि त्याच्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करणे अशा योजनांना येणाऱ्या काळात चालना दिली जाणार असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी बारिपाडा येथे सांगितले. 
बारीपाडा (ता. साक्री) येथे कृषिमंत्री दादा भुसे यांनी आदिवासी बांधव व शेतकऱ्यांसमवेत वाढदिवस साजरा केला. आरडीबीटीमार्फत शेतकऱ्यांना साहित्यवाटप करून देशबंधू आणि मंजुगुप्ता फाउंडेशन कंपनीचे कार्य जाणून घेतले. तसेच बारीपाडा रानभाज्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन केले. प्रांताधिकारी भीमराव दडादे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, कृषी विकास अधिकारी पी. एम. सोनवणे, तालुका कृषी अधिकारी सी. के. ठाकरे, गट विस्ताराधिकारी जे. टी. सूर्यवंशी, कृषी अधिकारी पंचायत समिती मंडळ कृषी अधिकारी शेजे, कृषी पर्यवेक्षक पी. एल. भामरे, आर. एम. नेतनराज, कृषी साहाय्यक पी. सी. ब्राह्मणे, मंडळ कृषी अधिकारी तोरवणे, मंडळ कृषी अधिकारी सुरेंद्र शिंदे, चैत्राम पवार, सरपंच सुनीता बागूल, साहेबराव पवार, अनिल पवार, आमदार मंजुळा गावित, पंचायत समिती सभापती प्रतिभा सूर्यवंशी, डॉ. तुळशीराम गावित, एपीआय दिलीप खेडकर, साक्री तालुका शिवसेना माजी अध्यक्ष विशाल देसले, पंचायत समिती सदस्य अजय सूर्यवंशी, युवासेना तालुकाध्यक्ष अभय शिंदे, कन्सरा मावली शेतकरी उत्पादक कंपनी कोंडाईबारीचे सचिव तानाजी बहिरम आदी उपस्थित होते. 

विक्रीसाठी जागा उपलब्‍ध करणार
मंत्री भुसे म्‍हणाले, की शेतात पिकलेला माल, भाजी, फळ थेट ग्राहकांना विक्रीसाठी शासनाच्या जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच जे विकेल तेच शेतकरी आता पिकवतील. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. अशा योजना आखल्या जात आहेत. तळागाळाच्या लोकांची प्रगती कशी होईल, हेच शासनाचे धोरण आहे. तसेच बारीपाडा व परिसरासाठी सोलरवर चालणारे शीतगृह मंजूर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. 

झोपडीत गेले अन्‌ खाल्‍ली खिचडी
बारीपाडा गावातील मोतीराम पवार या शेतकऱ्याच्या शेतातील महू फूल झाडे व पोल्ट्रीची पाहणी भुसे यांनी केली. पवार यांनी महू फुलाची व त्याचे फायदे भुसे यांना सांगितले. तसेच सोमनाथ चौरे शेतात स्वतःच बियाणे तयार करत असल्याने यांच्या शेतातील कांदा बी, लसूण बी, वांगे, मिरची बियाण्यांबद्दल माहिती जाणून घेत चौरे यांच्या झोपडीत खिचडीचा आस्वाद भुसे यांनी घेतला. 

loading image