
धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचा समावेश आहे. त्यांच्या समवेत शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील, मोहम्मद अरिफ नसीम खान, चंद्रकांत हांडोरे, प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांची निवड कार्यकारी अध्यक्ष म्हणून करण्यात आली आहे.
धुळे : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खळबळ उडवून देणारे बदल करण्यात आले आहेत. विद्यमान कार्यकारिणीतल्या अनेक मोठ्या व्यक्तींना फाटा देत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल रोहिदास पाटील यांची वर्णी लागली आहे. राज्याच्या कार्यकारीणीत कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे.
राज्य काँग्रेसमध्ये मोठा फेरबदल करण्यात आला असून, प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांची निवड करण्यात आली आहे. नाना पटोले यांच्या अध्यक्षपदाबरोबरच 6 नवे कार्यकारी अध्यक्ष राज्यात नेमण्यात आले आहेत. यामध्ये धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचा समावेश आहे. त्यांच्या समवेत शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील, मोहम्मद अरिफ नसीम खान, चंद्रकांत हांडोरे, प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांची निवड कार्यकारी अध्यक्ष म्हणून करण्यात आली आहे.
काँग्रेसची ध्येय धोरण आणि विचार तळगाळापर्यंत खास करून तरूण पिढीपर्यंत पोहचविण्याचे काम नवीन टीमच्या माध्यमातून करण्यात येईल. मावळते अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भक्कमपणे धुरा सांभाळली. आता येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाला गतवैभव कसे प्राप्त होईल यासाठी नाना पटोले यांच्या मागदर्शनाखाली नवीन टिम काम करेल हा विश्वास आहे.
- कुणाल पाटील, आमदार, धुळे ग्रामीण.