esakal | ‘जलजीवन मिशन’मध्ये ८९ गावांचा समावेश 
sakal

बोलून बातमी शोधा

jaljivan mission

पाण्यासाठी नागरिकांना एक-दोन किलोमीटर दूर अंतरावरून पाणी आणावे लागते. त्या मुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. ही गैरसोय दूर करण्यासाठी केंद्र शासनाने जल जीवन मिशनअंतर्गत ‘हर घर नलसे जल’ ही योजना सुरू केली आहे.

‘जलजीवन मिशन’मध्ये ८९ गावांचा समावेश 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे : केंद्र शासनाच्या जलजीवन मिशनअंतर्गत ‘हर घर नलसे जल’ जोडणीसाठी धुळे तालुक्यातील तब्बल ८९ गावांच्या समावेशाला मंजुरी मिळाली आहे. त्या मुळे संबंधित ८९ गावांमधील ग्रामस्थांना नळाद्वारे घरापर्यंत स्वच्छ पाणी मिळेल, अशी माहिती खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली. 
आजच्या स्थितीत बऱ्याच गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. पाण्यासाठी नागरिकांना एक-दोन किलोमीटर दूर अंतरावरून पाणी आणावे लागते. त्या मुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. ही गैरसोय दूर करण्यासाठी केंद्र शासनाने जल जीवन मिशनअंतर्गत ‘हर घर नलसे जल’ ही योजना सुरू केली आहे. केंद्र शासनाची ही योजना आपल्या मतदारसंघात राबविण्यासाठी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे आपण सतत पाठपुरावा केला. त्या अनुषंगाने मंत्री शेखावत यांनी मंजुरी देऊन धुळे तालुक्यातील ८९ गावांचा समावेश केला असल्याचे खासदार डॉ. भामरे यांनी म्हटले आहे. 

...या गावांचा समावेश 
अजंग, खेडे, शिरूड, कासविहीर, कुंडाणे (वेल्हाणे), सीताने, आर्णी, कुंडाणे, सोनेवाडी, बाबरे, कुंडाणे (वार), सोनगीर, बेहेड, दिवाणमळा, तांडा कुंडाणे, भिरडाई, लळिंग, उभंड, भिरडाणे, लामकानी, उडाणे, बोरिस, लोहगड, वणी बीके, बोरकुंड, लोणखेडी, वेल्हाणे, बोरसुले, मळाने, विंचूर, बोरविहीर, मोहाडी प्र., सुकवड, बुरझड, मोरदड तांडा, विश्वनाथ, हिंगणे, मोरशेवडी, वार, चिंचवार, मुकटी, दापुरा, धंडाने, दापुरी, नगाव बीके, देवभाने, तिसगाव, देऊर बीके, नंदाने, देऊर केएच, नवलाने, धाडरी, नावरी, धमाणे, महाल काळी, धोडी, महाल कांदामना, धनूर, महाल कसाद, लोनकुटे, महाल लोंडा, फागणे, महाल पांढरी, गोताणे, महाल रेवत, हडसुनी, महाल माळी, हेंद्रुण, नूरनगर नेर, तामसवाडी, निकुंभे, होरपडा, निमखेडी, विसरणे, न्याहळोद, जापी, पिंपरखेडे, जुनवणे, रानमळा, जुन्नेर, रतनपुरा, काळखेडे, सातरणे, कापडणे, सौंदाणे, कौठळ, सायने, खंडलाय केएच, शिरधाने प्र. डांगरी.  

संपादन ः राजेश सोनवणे
 

loading image