esakal | धुळे- मुंबई, पुणे रेल्‍वे सुविधा बंद; प्रवाशांचे होताय हाल
sakal

बोलून बातमी शोधा

railway

शिक्षण, व्यापार आणि वैद्यकीय उपचारासाठी मुंबई, पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यासाठी ते धुळे- चाळीसगाव रेल्वे आणि तेथून दादरपर्यंत पुढील रेल्वेने जातात. 

धुळे- मुंबई, पुणे रेल्‍वे सुविधा बंद; प्रवाशांचे होताय हाल

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

धुळे : रेल्वेची धुळे ते मुंबई, पुणे सुविधा बंद झाल्याने जिल्ह्यातील प्रवाशांचे हाल होत आहेत. ही सुविधा पूर्ववत होण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वे मंत्रालयाला सूचना द्यावी, असे साकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या येथील जिल्हा महिला शाखेने निवेदनाव्दारे घातले. 

पक्षाच्या येथील नेत्या डॉ. सुवर्णा शिंदे, महिला जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा यांनी खासदार सुळे यांना दिलेल्या निवेदनात म्‍हटले आहे, की धुळे जिल्ह्यातून शिक्षण, व्यापार आणि वैद्यकीय उपचारासाठी मुंबई, पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यासाठी ते धुळे- चाळीसगाव रेल्वे आणि तेथून दादरपर्यंत पुढील रेल्वेने जातात. 

म्‍हणूनच प्रवाशांची गैरसोय
प्रवाशांना ही सुविधा देताना रेल्वे व्यवस्थापनाकडून धुळे रेल्वे स्थानकावर धुळे- चाळीसगाव रेल्वेला मुंबई, पुण्याचे कोच लावले जातात. नंतर ते दादरपर्यंत जाणाऱ्या रेल्वेला लावले जातात. अशी सुविधा अनपेक्षितपणे केंद्रीय रेल्वे व्यवस्थापनाने बंद केल्याने धुळ्याहून मुंबई, पुणे प्रवास सेवा पूर्णतः बंद पडली आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. 

रोजची दोनशे प्रवाशी संख्या
धुळे जिल्ह्यातून मुंबईला रोज सरासरी २५४, तर पुण्याला रोज सरासरी १५० प्रवासी जातात. परतणाऱ्यांची संख्या तितकीच आहे. आता मुंबई, पुण्याला जाणारी रेल्वे सुविधाच बंद झाल्याने यावर अवलंबून प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यांना मुंबई, पुणे येथे जायचे असल्यास चाळीसगावला जावे लागते. त्यासाठी बुकिंग करावे लागते. प्रवाशांना नाहक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यातही वैद्यकीय उपचारातील गरजू रुग्ण असेल तर त्याला चाळीसगावपर्यंत जा, नंतर बुकिंग व मुंबई, पुण्यापर्यंत रेल्वेने जाण्याची सुविधा मिळू शकते. त्यात मनस्ताप स्विकारून सर्व सहन करावे लागते. प्रत्येक जण आगाऊ बुकिंग करू शकतो, असे नाही. अशी सर्व परिस्थिती पाहाता व प्रवाशांची गरज लक्षात घेता मुंबई, पुणे कोचची सुविधा पूर्ववत सुरू करून रेल्वेचा लाभ धुळे जिल्हावासियांना मिळावा. 

loading image