esakal | अधिकारी दाम्‍पत्‍यांची कोटीची अपसंपदा; गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

fir

स्वेच्छा निवृत्ती घेतलेले कक्ष अधिकारी राजेंद्रकुमार कृष्णराव गावित, पोलीस निरिक्षक ईला राजेंद्रकुमार गावित यांनी लाखोंची माया जमविली असून त्यांच्याकडे ४२ लाखांची अपसंपदा असल्याची तक्रार आहे.

अधिकारी दाम्‍पत्‍यांची कोटीची अपसंपदा; गुन्हा दाखल

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

धुळे : स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या मंत्रालयातील कक्ष अधिकारी संवर्गाच्या अधिकाऱ्याकडील अपसंपदा प्रकरणी त्याच्यासह पत्नीविरूध्द येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 
स्वेच्छा निवृत्ती घेतलेले कक्ष अधिकारी राजेंद्रकुमार कृष्णराव गावित, पोलीस निरिक्षक ईला राजेंद्रकुमार गावित यांनी लाखोंची माया जमविली असून त्यांच्याकडे ४२ लाखांची अपसंपदा असल्याची तक्रार आहे. त्यामुळे गावित दाम्पत्याविरूध्द गुन्हा दाखल झाला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे येथील पोलीस उपअधीक्षक सुनिल कुराडे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राजेंद्रकुमार गावीत (वय ५९, रा. प्रतापनगर, तळोदा, जि. नंदुरबार) याने मंत्रालयात वर्ग दोन पदावर कक्ष अधिकारी म्हणून काम करताना एक जानेवारी २००५ ते ३१ डिसेंबर २०१३ या कालावधीत दोन कोटी ४३ लाख ८१ हजार ४६१ रुपयांचे उत्पन्न संपादीत केले. त्यातून एक कोटी सहा लाख ९५ हजार ५८२ रुपये खर्च केले. लोकसेवक गावित याने एकूण एक कोटी ७९ लाख ३५ हजार २१९ रुपयांची मालमत्ता संपादीत केली. त्याच्याकडील मालमत्ता ज्ञात उत्पन्नाच्या स्वरुपापेक्षा ४२ लाख ४९ हजार ३४० रुपयांनी (१७. ४२ टक्के) अधिक आहे. ही अपसंपदा त्याने पत्नी ईला हीच्या नावे धारण केली. या गैरप्रकारात पत्नी ईला सहभागी असल्याचा ठपका आहे. 
 

loading image