esakal | साक्री तालुक्यात ६९ हजारांवर लाभार्थ्यांचे आधार लिंकिंग बाकीच 
sakal

बोलून बातमी शोधा

aadhar linking ration card

शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी आणि प्रत्येक पात्र लाभार्थ्याला थेट त्याच्या नावाने धान्य पोचविण्यासाठी ही मोहीम राबविली जाणार आहे.

साक्री तालुक्यात ६९ हजारांवर लाभार्थ्यांचे आधार लिंकिंग बाकीच 

sakal_logo
By
धनंजय सोनवणे

साक्री (धुळे) : तालुक्यातील अंत्योदय व प्राधान्य रेशन कार्डधारकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत गावातीलच स्वस्त धान्य दुकानदाराकडे आपले आधारकार्ड आपल्या रेशनकार्डशी लिंक करून घ्यावे यासाठी ३१ जानेवारी २०२१ पर्यंतची मुदत असून, तोपर्यंत सर्वांनी आधार लिंक करून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांनी केले आहे. 
शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी आणि प्रत्येक पात्र लाभार्थ्याला थेट त्याच्या नावाने धान्य पोचविण्यासाठी ही मोहीम राबविली जाणार आहे. यासाठी प्रत्येक अंत्योदय व प्राधान्य रेशनकार्डधारकांना त्यांचे आधारकार्ड, मोबाईल क्रमांक लिंक करणे आवश्यक आहे. सीडिंग करण्यासाठी रेशनकार्डधारकांनी आपल्या गावातीलच स्वस्त धान्य दुकानदाराकडे जाऊन ताबडतोब लिंकिंग करून घ्यावे. 

नोंदणीसाठी हे करावे लागणार
नोंदणीसाठी स्वस्त धान्य दुकानात जाताना आपल्या आधारकार्डची झेरॉक्स, मोबाईल क्रमांक तसेच अंगठ्याचा ठसा दिल्यास ईकेवायसी आधार जोडले जाणार आहे. दरम्यान, तालुक्यातील ६९ हजार ६४५ लाभार्थ्यांचे आधार लिंकिंग अद्याप बाकी असून, येत्या पंधरा दिवसांत या सर्वांनी पूर्ण करून घ्यावे अन्यथा त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच ज्या लाभार्थ्यांनी दोन ते तीन महिन्यांपासून धान्याची उचल केली नाही ते लाभार्थी अस्तित्वात नाहीत, असे गृहीत धरून त्यांचा धान्यपुरवठाही बंद करण्याच्या शासनाच्या सूचना असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. 

संपादनः राजेश सोनवणे