esakal | घरी आलेल्‍या पत्‍नीने दरवाजा उघडताच फोडला हंबरडा
sakal

बोलून बातमी शोधा

man suicide

घरची परिस्‍थिती बेताचीच होती. काम करून् पैसे कमविण्यासाठी गाव सोडून परिवार दुसऱ्या गावी आलेला. पती- पत्‍नी दोघेही मोलमजुरी करत, पण अचानक काय घडले कोणालाही समजले नाही. शेतात मजुरीसाठी गेलेल्‍या पत्‍नीने सायंकाळी घरी आल्‍यावर दरवाजा उघडला. पण समोरचे दृश्‍य पाहून तिने हंबरडाच फोडला.

घरी आलेल्‍या पत्‍नीने दरवाजा उघडताच फोडला हंबरडा

sakal_logo
By
सचिन पाटील

शिरपूर (धुळे) : वाघाडी (ता.शिरपूर) येथे 17 डिसेंबरला सायंकाळी साडेसातला सदरची घटना उघडकीस आली. पत्‍नी शेतात गेलेली तर मुलगा कामानिमित्‍ताने बाहेरगावी गेलेला. घरात एकटाच बाप. अचानक असे काही घडले की त्‍यांनी टोकाचे पाऊल उचलले. 

हेपण वाचा- शेती कामासाठी हवी होती आयशर..आता चव्हाण कुटूंबावर आली ही वेळ

घरात होते एकटेच
घरात कोणी नसताना सोमनाथ ओंकार कोळी (वय 50) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. सोमनाथ कोळी हे लाकूडतोड करून उपजीविका भागवत होते. त्यांची पत्नीही मोलमजुरी करून संसाराला हातभार लावते. पत्‍नी 17 डिसेंबरला शेतात मजुरीसाठी गेली होती. त्यांचा मुलगाही कामानिमित्त बाहेरगावी होता. घरात एकटे असतांना सोमनाथ कोळी यांनी राहत्या घरात गळफास घेतला. पत्नी सायंकाळी परत आल्यावर घराचे दार आतून बंद दिसले. तिने दार ठोठावूनही प्रतिसाद न मिळाल्याने शेजारी गोळा झाले. त्यांनी खटपट करून दार उघडल्यावर गळफास लावलेल्या अवस्थेत सोमनाथ कोळी यांचा मृतदेह आढळला. भाऊ बुधा कोळी याने मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. 

आत्‍महत्‍येचे कारण अस्‍पष्‍ट
मृत सोमनाथ कोळी गधडदेव (ता.शिरपूर) येथील मूळ रहिवासी असून अनेक वर्षापासून वाघाडी येथे स्थायिक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. हवालदार जी. एन.सत्तेसा तपास करीत आहेत.

संपादन ः राजेश सोनवणे

loading image