esakal | हवालदार जावयाची सासऱ्याला अश्‍लील चॅटींग; घडल्‍या प्रकाराने मुलीचाही संताप
sakal

बोलून बातमी शोधा

whatsapp chating

पती- पत्‍नीमध्ये वाद असल्‍याने पत्‍नी माहेर गेली पण येत नाही. पण मुंबई येथे पोलिस हवालदार असलेल्‍या जावयाने पत्‍नीला सोडले आणि सासऱ्याच्या मोबाईलवर रात्रीच्या सुमारास संदेश पाठविले; ते देखील अश्‍लील. या प्रकाराने सासराच नव्हे तर पत्‍नी देखील चक्रावली. 

हवालदार जावयाची सासऱ्याला अश्‍लील चॅटींग; घडल्‍या प्रकाराने मुलीचाही संताप

sakal_logo
By
सचिन पाटील

शिरपूर (धुळे) : पत्नीशी पटत नसलेल्या हवालदार जावयाने सासऱ्याला व्हॉट्सॲपवर अश्‍लील शिवीगाळ असलेला मजकूर टाकून चॅटिंग केली. या प्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. हिंमतराव पवार (वय ६३, रा. गजानन कॉलनी, शिरपूर) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली. 

शिरपूर येथील हिंमतराव पवार यांच्या मुलीचा विवाह नवी मुंबई येथील आगरीपाडा पोलिस ठाण्यात हवालदार असलेले सचिन सूर्यवंशी यांच्याशी झाला आहे. पती- पत्नीत मतभेद निर्माण झाल्याने पवार यांची मुलगी सध्या माहेरी आहे. पत्‍नी येत नाही म्‍हणून सचिन सुर्यवंशी यांनी हिंमतराव पवार यांच्या मुलींना उद्देशून अश्‍लील संदेश व्हॉटस्‌ॲपवर पाठविला.

पत्‍नीचा राग सासऱ्यावर
बुधवारी (ता. ६) रात्री साडेदहाला संशयित सूर्यवंशी याने पवार यांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲपद्वारे चॅटिंग केले. व्हॉटस्‌ॲपवर आलेला संदेश पाहून हिंमतराव पवार यांना अगदी धक्‍काच बसला. त्‍यांनी रात्री कोणाशीही चर्चा केली नाही. सचिन सुर्यवंशी यांची पत्‍नी माहेरी असल्‍याने त्‍याचा राग आल्‍याने त्‍यांनी संदेश केला. मात्र पवार यांच्या मुलींना उद्देशून अश्‍लील शब्दांत शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

कुटूंबासोबत चर्चेनंतर गुन्हा
जावयाकडून आलेल्‍या अश्‍लील संदेशाबाबत हिंमतराव पवार यांनी घडलेल्‍या प्रकाराबाबत मुली आणि नातलगांशी चर्चा केली. यानंतर जावयाविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेत पवार यांनी सचिन सुर्यवंशी यांच्या विरूद्ध शिरपूर पोलिस स्‍टेशनला गुन्हा दाखल केला.

संपादन ः राजेश सोनवणे

loading image