तहसील कार्यालयात सकाळी आरक्षण सोडत काढण्यात आली. प्रांताधिकारी डॉ. विक्रमसिंह बादल, तहसीलदार आबा महाजन, नायब तहसीलदार गणेश आढारी, मंडळ अधिकारी पी. पी. ढोले उपस्थित होते. शबा निसार शेख या सहा वर्षीय बालिकेच्या हस्ते सोडत काढण्यात आली.
शिरपूर (धुळे) : तालुक्यातील 60 ग्रामपंचायतीवर महिला राज येणार असल्याचे सोमवारी (ता.1) काढलेल्या आरक्षण सोडतीनंतर स्पष्ट झाले. पेसा क्षेत्रातील 25, अनुसूचित जातीच्या तीन, अनुसूचित जमातीच्या आठ, इतर मागास प्रवर्गातील नऊ तर सर्वसाधारण 15 ग्रामपंचायतींचे सरपंच पद भूषवण्याची संधी महिलांना प्राप्त झाली आहे.
तहसील कार्यालयात सकाळी आरक्षण सोडत काढण्यात आली. प्रांताधिकारी डॉ. विक्रमसिंह बादल, तहसीलदार आबा महाजन, नायब तहसीलदार गणेश आढारी, मंडळ अधिकारी पी. पी. ढोले उपस्थित होते. शबा निसार शेख या सहा वर्षीय बालिकेच्या हस्ते सोडत काढण्यात आली.
महिलांसाठी राखीव ग्रामपंचायती अशा
- पेसा ग्रामपंचायती (सर्व अनुसूचित जमाती) : नटवाडे, शेमल्या, हिंगोनीपाडा, भोईटी, गधडदेव, हिगाव, मालकातर, हातेड, पळासनेर, निमझरी, खामखेडा प्र आंबे, नांदर्डे, चांदसे, जळोद, झेंडेअंजन, हिवरखेडा, खैरखुटी, खंबाळे, उमर्दा, बुडकी, पनाखेड, लौकी, आंबे, जोयदा, फत्तेपूर फॉरेस्ट.
- अनुसूचित जाती : ताजपूरी, रुदावली, होळ.
- अनुसूचित जमाती : कळमसरे, खर्दे खुर्द, जुने भामपुर, मांजरोद, बाळदे, आमोदा, तरडी, अजंदे बुद्रुक.
- इतर मागास वर्गीय : आढे, पिळोदा, कुरखळी, असली तांडे, विखरण, भाटपुरा, बभळाज, मांडळ, घोडसगाव.
- सर्वसाधारण : पिंप्री, बोरगाव, शिंगावे, थाळनेर, सावेर गोदी, अंतुर्ली, दहिवद, उंटावद, जैतपुर, लोंढरे, अर्थे बुद्रुक, अजंदे खुर्द, भावेर, पिंपळे, बाभूळदे.
संपादन ः राजेश सोनवणे