अवकाळीने शेतकऱ्यांना रडवले; शिंदखेड्यातील दहा महसूल मंडळात 168 मिलीमीटर नोंद 

विजयसिंग गिरासे
Friday, 19 February 2021

सायंकाळी साडेसातच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसला सुरूवात झाली. रात्री सुमारे एक तास पाऊस झाला. या अवकाळी पावसांमुळे रब्बी हंगामातील गहू, दादर, हरभरा, ज्वारी, कांदा, भाजीपाला शेंवगा, मेथी, पालक व बोर, निंबू, खरबूज पिंकाचे हजारो हेक्टरवरील पिंकाचे नुकसान झाले आहे.

चिमठाणे (धुळे) : शिंदखेडा तालुक्यात गुरूवारी (ता.18) सायंकाळी झालेल्‍या अवकाळी पावसामुळे तोंडांशी आलेला गहू, दादर, हरभरा, कांदा, ज्वारी, खरबूज, शेंगा, बोर फळांचे व गुरांचा चाराचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यात सर्वात जास्त पाऊस चिमठाणे महसूल मंडळात 47 मिलीमीटर तर सर्वात कमी शेवाडे महसूल मंडळात दोन मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. 
तालुक्यात गुरूवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसला सुरूवात झाली. रात्री सुमारे एक तास पाऊस झाला. या अवकाळी पावसांमुळे रब्बी हंगामातील गहू, दादर, हरभरा, ज्वारी, कांदा, भाजीपाला शेंवगा, मेथी, पालक व बोर, निंबू, खरबूज पिंकाचे हजारो हेक्टरवरील पिंकाचे नुकसान झाले आहे. कृषी व महसूल विभागाने सयुक्त पंचनामे करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

शिंदखेडा तालुक्यात गुरूवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू, दादर, हरभरा, कांदा, ज्वारी आदी पिंकाचे व गुराच्या चारा नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल व कृषी विभागांना आदेश देण्यात आले आहेत. 
जयकुमार रावल, माजी मंत्री तथा आमदार शिंदखेडा मतदारसंघ

तालुक्यात मंडळ निहाय झालेला पाऊस 
दोंडाईचा- 08 मिलीमीटर 
विखरण - 07 
शेवाडे - 02
चिमठाणे - 47
वर्शी - 13
खलाणे - 05
बेटावद - 28
नरडाणा - 25
विरदेल - 09

एकूण :- 168

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news untimely rain and farmer loss farm