बीज प्रक्रिया केद्रांचे राज्यात पुनरुज्जीवन 

bij prakriya
bij prakriya

णपूर (ता. चोपडा) : बियाणे व लागवड साहित्य उपअभियान (एसएमएसपी) या केंद्र पुरस्कृत अभियानांतर्गत २०१९- २० करिता बीज प्रक्रिया केंद्र व बियाणे साठवणूक गोदामांच्या उभारणीसाठी राज्यातील ४१ संस्थांना निधी मंजूर करून केंद्राने या संस्थांना पुनरुज्जीवन दिले आहे. पहिल्या टप्प्यातील २१ संस्थांचा निधी राज्याला वर्ग झाला असून, त्यात खानदेशातील दोन संस्थांचा समावेश आहे. 
शेतकरी उत्पादक कंपनी स्वयंसहायता गट, अन्नधान्य उत्पादक संघ, सहकारी संस्था यांना उत्पादकता वाढ व उच्च प्रतीचे बीजोत्पादनासाठी केंद्र पुरस्कृत योजनेतून प्रत्येकी ६० लाख रुपये निधी ५०० मेट्रिक टन क्षमतेचे बीज प्रक्रिया केंद्र व बियाणे साठवणूक गोदामांसाठी हा निधी दिला जातो. देशात त्यासाठी ५०० युनिटचा इष्टांक केंद्र शासनाने निश्‍चित केला होता. महाराष्ट्रासाठी ५० युनिटचा लक्षांक देण्यात आला होता. मात्र, प्रथम टप्प्यात १९ प्रकल्प निकषात बसले होते. आता २१ प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली असून, त्यांचा निधी केंद्राने राज्याला मंजूर केला असून, वर्ग केला आहे. राज्य समिती बैठक घेऊन हा निधी आता संबंधित संस्थांना वर्ग करेल. 


राज्यातील पहिल्या टप्प्यातील मंजूर झालेल्या संस्था 
एनएनजी ॲग्रो कंपनी, वानेगाव (उस्मानाबाद), आनंदवाडी ॲग्रो ॲण्ड ॲनिमल हजबंड्री प्रोड्यूसर कं. उस्मानाबाद, संतकृपा ॲग्रो प्रोडक्ट, बोरखेडा (उस्मानाबाद), नगर नारायण फार्मर्स प्रोड्युसर कं. पौंडूक (बीड), बालाघाट ॲग्रो प्रॉडक्ट्‌स कंपनी, साखरे बोरगाव (बीड), शिवाजी विकास सहकारी संस्था (जळगाव), बालानाथ शेतकरी उत्पादक कंपनी (जि. वाशिम), फार्मर्स फ्रेन्डस्‌ ऑर्गोनिक प्रोड्युसर कंपनी (बीड), क्रांती ज्योती ॲग्रो प्रॉडक्ट (बीड), इकोसेफ ॲग्रो प्रॉडक्ट कंपनी लि. कर्जत (नगर), महाराष्ट्र बियाणे प्रोड्युसर कं. लि. कर्जत (नगर), सतोना फार्मर्स प्रोड्युसर कं. परतूर (जालना), जिवनमित्र सोशियल शेतकरी बचतगट, जाफराबाद (जालना), श्रीकर ॲग्रो प्रोड्युसर कं. लि. भडगाव (लातूर), किसनदिशा फार्मर्स प्रॉड्युसर कं. लि. जवळा बुद्रुक (हिंगोली), भातसा ॲग्रो प्रॉड्युसर कं. अंदड (ता. शहापूर, जि. ठाणे), खानदेश कृषी विचार मंच, पढावद (ता. शिंदखेडा, जि. धुळे), विदर्भ कल्याण ॲग्रो प्रोड्युसर कं. तिवसा (जि. अमरावती), विदर्भ शेतकरी कृषी माल प्रक्रिया व उद्योग प्रोड्यसुर चांदूर बाजार (जि. अमरावती), राजश्री फार्मर्स प्रोड्यसर (जि. बुलडाणा). 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com