esakal | रात्रीच्या अंधारात ट्रक थांबवून करायचे लूट; रात्रीचा प्रयत्‍न फसला

बोलून बातमी शोधा

truck robbery}

अक्कलकुवा हद्दीतील अंकलेश्वर- बऱ्हाणपूर महामार्गावर खापर गावाजवळ ट्रक चालकास लूटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी अक्कलकुवा पोलिस निरीक्षक राजेंद्र शिंगटे यांनी गुप्त बातमीदार सक्रीय केले होते.

रात्रीच्या अंधारात ट्रक थांबवून करायचे लूट; रात्रीचा प्रयत्‍न फसला
sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार : अक्कलकुवा हद्दीतील अंकलेश्वर- बऱ्हाणपूर महामार्गावर खापर गावाच्या शिवारात ट्रक व इतर वाहनांना अडवून चालकांकडे असणारे पैशांची जबरदस्तीने लूट केल्याच्या घटना वाढल्या होत्या. सदरची बाब गांभीर्याने घेत अक्कलकुवा पोलिसांनी सापळा रचून वाहनचालकांना लूटणारी टोळी जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून लूटीसाठी वापरलेली कार व काही रोकड जमा केली आहे. 
अक्कलकुवा हद्दीतील अंकलेश्वर- बऱ्हाणपूर महामार्गावर खापर गावाजवळ ट्रक चालकास लूटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी अक्कलकुवा पोलिस निरीक्षक राजेंद्र शिंगटे यांनी गुप्त बातमीदार सक्रीय केले होते. शनिवारी (ता.२७) खापर गावाजवळ हॉटेल टिपटॉपजवळ एका ट्रकला दोन इसमांनी अडविल्याची माहिती पोलिस निरीक्षक शिंगटे यांना मिळाली. त्यानुसार तत्काळ पथकासह खापर महामार्गावर जावून खात्री केली. यावेळी ट्रक (क्र.जी.जे.९७ वायवाय ३५६०) ही रस्त्यावर उभी असल्याचे व त्यासमोर एक कार (क्र.एम.एच.१२ एलव्ही ५३९०) या वाहनात दोन इसम बसले असून कार सुरु करुन निघण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले. सदर वाहनाबाबत शंका आल्याने कार अडवून ट्रक चालकास विचारपूस केली असता त्याने कारमधील दोघांनी वाहन आडवे उभे करुन तार व खिळे लावलेल्या लाकडी दांड्याने व लोखंडी पाईपने धमकावून अरेरावी केल्याचे सांगितले. तसेच ट्रक चालकाकडून कारमधील दोघांनी १ हजार रुपये हिसकावून घेतल्याचे पोलिसांना सांगितले. 

पोलिसांनी केली कारची तपासणी
पोलिसांनी सदर कार ताब्यात घेवून झडती घेतली असता त्यात ट्रक चालकाने सांगितल्यानुसार तार व खिळे लावलेला लाकडी दांडा व लोखंडी पाईप असे साहित्य आढळले. कारमधील अहमद हुसेन उर्फ रितीब शाहदाद मक्राणी व अनिस राजमोहंमद (रा.अक्कलकुवा) यांना विचारपूस केली असता ट्रक चालकास बळजबरीने लूटल्याचे त्यांनी मान्य केले. लूटीतील १ हजार रुपये काढून दिले. पोलिसांनी लूटीसाठी वापरलेली सुमारे ४ लाख रुपये किंमतीची कार जप्त केली आहे. याप्रकरणी ट्रक चालक दादाभाई बच्चूभाई मलिक (रा.भरुच) यांच्या फिर्यादीवरुन दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे. सदरची कामगिरी पोलिस निरीक्षक राजेंद्र शिंगटे, पोलिस उपनिरीक्षक सुरेश चौधरी, ज्ञानेश्वर बडगुजर, पोकॉ.प्रशांत यादव, अश्विन ठाकरे, देविदास विसपुते, किशोर वळवी यांच्या पथकाने केली. 

संपादन ः राजेश सोनवणे