esakal | गावरान जातीच्या बैलाला लागली विक्रमी बोली; सव्वा कोटीची उलाढाल 
sakal

बोलून बातमी शोधा

the bull market

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी बैल बाजारात उत्साह व तेजी दिसून आली. नुकताच खरीप हंगामाची सांगता होऊन शेतकऱ्यांचा हाती पैसा आल्याने बाजारात उत्साह असल्याचे जाणकार सांगतात.

गावरान जातीच्या बैलाला लागली विक्रमी बोली; सव्वा कोटीची उलाढाल 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

आमलाड (नंदुरबार) : तळोदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात १ जानेवारीला भरलेल्या आठवडेबाजारातील बैल बाजारात एकाच दिवशी सुमारे सव्वा कोटींवर उलाढाल झाली. विक्रीसाठी सुमारे पंधराशे बैल आले होते. पैकी ८२३ वर बैलांची विक्री झाली. सव्वा कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे बाजार समितीचे सचिव सुभाष मराठे यांनी सांगितले. 
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हातोडा रोडलगतच्या आवारात कोविड १९ चा अपवाद वगळता दर शुक्रवारी बैल बाजार भरतो. सोबत कोंबड्या, शेळ्या व इतर पशूंचा बाजार भरतो. यात तालुक्यासह धडगाव, अक्कलकुवा, नंदुरबार, शहादा आदी तालुक्यांतील शेतकरी आपले पशू खरेदी-विक्रीसाठी आणतात. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी बैल बाजारात उत्साह व तेजी दिसून आली. नुकताच खरीप हंगामाची सांगता होऊन शेतकऱ्यांचा हाती पैसा आल्याने बाजारात उत्साह असल्याचे जाणकार सांगतात. प्रशासक पी. बी. पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव सुभाष मराठे, सहाय्यक सचिव हेमंत चौधरी, निरीक्षक संजय कलाल, लेखापाल प्रसाद बैकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी या आठवडे बैल बाजाराचे संयोजन केले. 

परराज्‍यातून विविध जातीचे बैल
बाजारात मध्य प्रदेश, गुजरात राज्यातील लगतचा भागातील तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांतून शेतकऱ्यांनी गावठी, खेडा, ठेलारी, पंढरपुरी, मालवी आदी जातींचे बैल होते. बैलांच्या खरेदीसाठी मध्य प्रदेशातील खेतीया, सेंदवा, गुजरातमधील सागबारा, उमरणा, उच्छल, हवाडांग, बेज, जळगाव, जामनेर, धुळे, दोंडाईचा, नंदुरबार आदी ठिकाणाहून शेतकरी व व्यापारी उपस्थित झाले होते. 

विक्रमी किमतीला प्रथमच विक्री 
बाजारात एक गावठी जातीचा बैल ४८ हजार ५०० रुपये एवढ्या विक्रमी किमतीला विकला गेला. हा बैल उमराणी (ता. धडगाव) येथील शेतकरी डुमल्या नाऱ्या पावरा यांचा होता. तो उमराणा (ता. सागबारा, जि. नर्मदा गुजरात) येथील शेतकरी रमेशभाई दिनाभाई पटेल यांनी खरेदी केला. एकच बैल एवढ्या विक्रमी किमतीला प्रथमच विक्री झाल्याची घटना असल्याचे जाणकार सांगतात. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

loading image