esakal | शासकीय यंत्रणांनी कामे वेळेत पूर्ण करावी
sakal

बोलून बातमी शोधा

rajendra bharud

शासकीय यंत्रणांनी कामे वेळेत पूर्ण करावी; जिल्‍हाधिकारी डॉ. भारूड यांनी केल्‍या सूचना

sakal_logo
By
राजेश सोनवणे

नंदुरबार : शासकीय यंत्रणांनी मॉन्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करावीत आणि कोरोना परिस्थिती लक्षात घेता आरोग्य विभागाने (Health department)आवश्यक दुरुस्तीची कामे त्वरित करून घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड (Nandurbar collector rajendra bharud) यांनी दिले. (nandurbar collector bharud meet mansoon should complete the work on time)

दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित मॉन्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वसंत बोरसे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: कारवाईचा सलग तिसरा दिवस; दुकानदारांकडून नियम धाब्‍यावर

डॉ. भारूड म्हणाले, की मॉन्सूनपर्वू रस्ता दुरुस्ती, गटार व नालेसफाई, विद्युत दुरुस्तीची कामे वेळेत करावी. कुठलेही नवे काम सुरू करू नये. केवळ दुरुस्तीची कामे करावी. पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये. संबंधित विभागांनी नियंत्रण कक्ष स्थापन करावे आणि त्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी. आपत्तीच्या वेळी आवश्यक असणारे साहित्य तपासून घ्यावे. धोकादायक ठिकाणांची निश्चिती करून त्याठिकाणी सूचना फलक लावावेत. पूरग्रस्त व दरडग्रस्त गावांसाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. धरणनिहाय संपर्क अधिकारी नियुक्त करावेत. कृषी विभागाने हवामान खात्याकडून येणारा इशारा तत्काळ शेतकऱ्यांपर्यंत पोचवावा.

प्रकल्‍पांची पाहणी करून करा दुरूस्‍ती

आरोग्य विभागाने पावसाळ्यात उद्‍भवणाऱ्या साथीच्या रोगांबाबत पुरेसा औषधसाठा करून ठेवावा. प्रथमोपचार गटाची बांधणी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय करावी. कार्यकारी अभियंता आणि तहसीलदार यांनी संयुक्तपणे लघु व मध्यम प्रकल्पाची पाहणी करून आवश्यकता असल्यास कार्यकारी अभियंता यांनी तत्काळ दुरुस्ती करून घ्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने भूस्खलन ठिकाणांची निश्चिती करून आवश्यक उपाययोजना कराव्यात. रस्त्याच्या दुतर्फा असलेली धोकादायक झाडे व झाडाच्या फांद्यांबाबत आवश्यक कार्यवाही करावी. रस्त्याच्या बाजूच्या पट्ट्या मुरूम टाकून भराव्यात.

हेही वाचा: success story : शेतकरीपुत्र झाला इंजिनिअर पण धडपड बळीराजासाठीच; ‘हवामान’ ॲप ठरणार वरदान

पालिकेनेही घ्‍यावा आढावा

पालिकेने शहरातील नालेसफाईबाबत आढावा घ्यावा व कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण द्यावे. पाटबंधारे विभागाने दैनंदिन पाणीसाठा, विसर्ग, पर्जन्यमान आदी माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास पाठवावी. पुरवठा विभागाने आपत्ती काळात पुरेसा धान्यसाठा वितरणाबाबत नियोजन करावे. महावितरणने आवश्यक कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत.

loading image