अनधिकृत बियाणे विक्रीची झळ परवानाधारकांनाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cotton seeds

अनधिकृत बियाणे विक्रीची झळ परवानाधारकांनाही

sakal_logo
By
टीम ई सकाळ

शहादा (नंदुरबार) : अनधिकृत कापूस बियाणे (Cotton seeds) विक्रीची झळ अधिकृत परवानाधारक बियाणे विक्रेत्यांनाही बसत असून त्यांच्या विक्रीवरही त्याचा थेट परिणाम होत आहे. परिणामी अधिकृत बियाणांचा खप दिवसेंदिवस कमी होत आहे. याला आवर घालण्यासाठी आता अधिकृत बियाणे उत्पादक कंपन्या व परवानाधारक कृषी सेवा केंद्र (Agriculture department) संचालकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. (nandurbar cotton seeds duplicate packet sell)

हेही वाचा: मे हीटचा तडाखा की पोलिसांची धास्ती..रस्त्यांवर शुकशुकाट

अनधिकृत कापूस बियाणे विक्रीच्या फोफावलेल्या धंद्याची झळ अनेक घटकांना बसत आहे. त्यात अधिकृत बियाणे कंपन्या, परवानाधारक कृषी सेवा केंद्र आदींसह सर्वसामान्य शेतकऱ्यांना याची झळ सोसावी लागत आहे. यात फक्त कथित विक्रेते गब्बर होत आहे. शासन दरबारी कडक कायदे किंवा अनधिकृत बी-बियाणे विक्रीला आवर घालण्यासाठी कृषी विभागाने धडक मोहीम राबवणे गरजेचे आहे. अल्पकाळात उत्पादनाचे आमिष दाखवून अनधिकृत बियाणे विक्री करणाऱ्या विरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शासन दरबारी कारवाई करताना नेमके काय अडथळे येतात ते मांडणे आवश्यक आहे. अन्यथा छापे मारून बियाणे पकडले जाते त्यात मोजकाच माल सापडतो. बराचसा माल मात्र संबंधित विक्रेता अन्य ठिकाणी लपवून ठेवतात. त्यातून पकडलेल्या मालाचे काहीच सोयरसुतक त्यांना नसते. त्यासाठी सखोल चौकशी करून धागेदोरे तपासण्याचे कष्ट संबंधित यंत्रणेने घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा: कोविडच्या रणसंग्रामात ३१ शिक्षक योध्दांनी गमावला जीव

परवानाधारकांची संघटना गप्प का?

दरम्यान, आपल्या न्याय हक्कासाठी विविध संघटना स्थापन झालेल्या आहेत. त्यात अधिकृत परवानाधारक बियाणे विक्रेत्यांनीही आपली संघटना स्थापन केली आहे. कथित अनधिकृत बियाणे विक्रेत्यांचा बंदोबस्तासाठी आता परवानाधारक कृषी सेवा केंद्र संचालकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. कारण अनधिकृत बियाणे विक्रीची झळ त्यांनाही सोसावी लागत आहे. यातून त्यांच्या थेट विक्री व अन्य बाबींवरही परिणाम होऊ पाहत आहे. यासाठी पुढाकार घेऊन बंदोबस्त करणे आवश्यक आहे.

अनधिकृत बियाणे विक्री होत असल्याने त्याच्या परिणाम सहाजिकच परवानाधारक कृषी सेवा केंद्रावर होत आहे. त्यामुळे अधिकृत व मान्यता प्राप्त बियाण्याचा खप कमी होतो. शेतकऱ्यांनी अधिकृत बियाण्याची परवाना धारक कृषी सेवा केंद्रांवरूनच खरेदी करावी.

- कन्हूभाई पटेल, तालुकाध्यक्ष, शहादा

loading image
go to top