esakal | तळोदा- शहादा येथे घरफोडी साडेतीन लाख लांबविले

बोलून बातमी शोधा

robbery
तळोदा- शहादा येथे घरफोडी साडेतीन लाख लांबविले
sakal_logo
By
टिम इ सकाळ

नंदुरबार : तळोदा व शहादा येथे काल दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाडसी घरफोड्या झाल्या. त्यात चोरट्यांनी सुमारे साडेतीन लाखाचा एवज लांबविला आहे. या दोन्ही घटनांबाबत तळोदा- शहादा पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तळोदा येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा दावल शा बाबा सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा वंदना तोरवणे या शुक्रवारी (ता.३०) सायंकाळी साडेचार ते सातच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. त्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांचा बंद घराचा दरवाजाच्या कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाटात असलेले ६० हजार रूपये रोख व ३५ हजार रूपये किमंतीचे सोन्याचे दागिने असा एकूण ९५ हजाराचा एवज चोरट्यांनी लांबविला. ही घटना सामाजिक संस्थेचे कर्मचारी संदीप हंसराज भामरे यांच्या लक्षात आली. त्यांनी तळोदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुटुंब बाहेर पडले अन्‌

दुसऱ्या घटनेत शहादा शहरातील रामदेव बाबानगरमधील रहिवाशी गौतम जमदाळे हे कुटुंबासह घराला कुलूप लावून शनिवारी (ता.१) सायंकाळी बाहेर गेले होते. घराला कुलूप असल्याची संधी साधत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यावेळी घरातील बेडरूममधील कपाटाचा लॉकरमधील दीड लाख रूपये रोख व ८४ हजा रूपये किमंतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना जितेंद्र भिमराव जमदाळे यांच्या लक्षात आल्याने त्यांने शहादा पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार त्यांचा फिर्यादीवरून शहादा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.