सातपुडा भगवामय करा : अब्दुल सत्तार 

धनराज माळी
Saturday, 26 December 2020

तोरणमाळ ग्रामपंचायतमधील झापी या गावाच्या अतिदुर्गम मांजणी पाड्यातील जितेंद्र पावरा या विद्यार्थ्याला भौगोलिक प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वैद्यकीय शाखेत (एमबीबीएस) प्रवेश मिळविल्याने त्याचा सत्कार करण्यात आला.

धडगाव (नंदुरबार) : ग्रामपंचायत निवडणुकीत धडगाव तालुक्यात जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवून संपूर्ण सातपुडा भगवामय करण्याचे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. 
शिवसेनेच्या धडगाव तालुका पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. धुळे व नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, सहसंपर्कप्रमुख संजय उकिरडे, आमदार मंजुळा गावित, विधानसभा संपर्कप्रमुख दीपक साळवे, जिल्‍हा परिषद उपाध्यक्ष राम रघुवंशी, जिल्‍हा परिषद सदस्य विजय पराडके, रवींद्र पराडके, गणेश पराडके, हिराबाई पराडके, पंचायत समिती सभापती धनसिंग पावरा, भाईदास अत्रे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रीना पाडवी, धनसिंग पावरा, माजी जिल्‍हा परिषद सदस्य योगेश पाटील, संदीप वळवी, गेमलसिंग वळवी, भगतसिंग पाडवी, काळूसिंग पावरा, चंद्रसिंग पाडवी, शंकर पावरा, अशरफअली सय्यद, शरीफ पिंजारी, मुस्लिम समाज उपाध्यक्ष फारुख मजिद मण्यार, रफिक अब्बास पिंजारी आदी उपस्थित होते. 

विद्याथ्‍र्यांचा केला सत्‍कार
अब्दुल सत्तार यांच्या हस्ते वडफळ्या व जुने धडगाव येथे फलक अनावरण झाले. मेळाव्यात तोरणमाळ ग्रामपंचायतमधील झापी या गावाच्या अतिदुर्गम मांजणी पाड्यातील जितेंद्र पावरा या विद्यार्थ्याला भौगोलिक प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वैद्यकीय शाखेत (एमबीबीएस) प्रवेश मिळविल्याने त्याचा सत्कार करण्यात आला. विजय ब्राह्मणे यांनी सूत्रसंचालन केले. मेळावा यशस्वितेसाठी तालुकाप्रमुख महेशकुमार पाडवी, उपतालुकाप्रमुख दिलीप पाडवी, रणजित चव्हाण, उपशहरप्रमुख अनिल खैरनार, अजय भावसार, पिंटा वळवी, बावा पाडवी, बारदा पावरा, रिजवान बेलदार, बंटी सोनवणे, रघुनाथ पावरा, शोएब शाह, आसिफ मण्यार, जावेद बेलदार, अरबाज खाटीक, ज्योती बोलसे आदींनी सहकार्य केले.  

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news dhadgaon abdul sattar shiv sena