हजारो रुपये किलोने बियाणे; आता कांद्याचा भाव चार ते पाच रुपये किलो

हजारो रुपये किलोने बियाणे खरेदी; आता कांद्याचा बाजारभाव केवळ चार ते पाच रुपये किलो
onion
oniononion

वैंदाणे (नंदुरबार) : कांदा लागवडीसाठी महागडे बियाणे शेतकऱ्यांनी बाहेरील जिल्ह्यातून आणले होते. काही शेतकऱ्यांनी तर गुजरात व मध्य प्रदेशमधूनही हजारो रुपये खर्च करून बी आणले. त्यातही बऱ्याच प्रमाणात बी खराब निघाले, तरीही हार न मानता आहे त्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी कांदालागवड केली. मात्र, कांद्याचे भाव अगदी कवडीमोल झाल्यामुळे लागवड खर्च तर सोडाच, पण बी खरेदीचा खर्चही निघत नसून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे.

तीन ते चार महिने कांदा पिकला पाणी, खत देऊन निंदनी करण्यापर्यंतचा खर्च, त्यानंतर कांदा तयार झाल्यावर त्याची काढणी आणि वाहतूक खर्चाचा हिशेब पाहता शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे कापसाच्या पिकाचे नुकसान झाले होते. कापसाचे बोंड सडून गेली होती. हे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी कांदा पिकाला पसंती दिली होती. मात्र, कांद्याच्या पिकानेही वांदा केल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

साठवणुकीवर भर

ज्या शेतकऱ्यांनकडे कांदा साठवणुकीची व्यवस्था आहे त्या शेतकऱ्यांनी साठवणुकीवर भर दिला आहे, तर काही शेतकऱ्यांनी तात्पुरती व्यवस्था करून, तर काहींनी भाडेतत्त्वावर कांदाचाळ घेतली असून, त्यात कांदे साठवणूक करत आहेत. तर दुसरीकडे गावात व्यापारी तीन ते चार रुपये किलोप्रमाणे कांदा खरेदी करत आहेत. जे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. मात्र लॉकडाउन असल्याने भाव कधी वाढतील याचीही खत्री नाही. शिवाय तात्पुरत्या स्वरूपात साठवून करूनही कांदा सडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उत्पन्न कमी होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी तीन ते चार रुपयेप्रमाणे का असेना पण आहे त्या भावत विक्री केली.

कांदे विक्रीसाठी मी अहमदाबादला घेऊन गेलो होतो. मला सहा रुपयांचा भाव मिळाला. गाडीभाडे, मजुरी, कांद्याचे कट्टे याचा हिशेब करता पदरी निराशा आली. गेल्या वर्षीही अशीच परिस्थिती होती. लॉकडाउनचा फटका शेतकऱ्यांनाही बसत आहे. शेतकऱ्यांनी जगावे कसे, हा प्रश्नच आहे.

-सतीश बच्छाव, कांदा उत्पादक शेतकरी, वैंदाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com