esakal | सरपंच व्हायचेय मग ही परीक्षा पास असणे बंधनकारक
sakal

बोलून बातमी शोधा

sarpanch

राज्य निवडणूक आयोगाने 11 डिसेंबर 2020 चा आदेशान्वये एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. यासाठी नामनिर्देशनची प्रक्रिया 23 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. 

सरपंच व्हायचेय मग ही परीक्षा पास असणे बंधनकारक

sakal_logo
By
फुंदीलाल माळी

तळोदा (नंदुरबार) : राज्यातील निवडणूक घोषित झालेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी 1 जानेवारी 1995 रोजी व त्यानंतर जन्मलेल्या उमेदवारांना इयत्ता सातवी पास झाल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यात सरपंच पदाची निवड थेट निवडणूक ऐवजी निवडून आलेल्या सदस्यांमधून करावयाची असल्याने सरपंच बनण्यास इच्छुक सदस्यांना सातवी पास असावे लागणार आहे. 

हेपण वाचा- भाजप नगरसेवकाचा प्रताप; हात जोडून दखल न घेतल्याने अधिकाऱ्याला खड्यात ढकलत मारली कानाशिलात

राज्य निवडणूक आयोगाने 11 डिसेंबर 2020 चा आदेशान्वये एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. यासाठी नामनिर्देशनची प्रक्रिया 23 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. 

असा घातला नियम
मात्र 24 डिसेंबरला रोजीराज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुका संदर्भात कळवले आहे, की 13 ऑगस्ट 2018 च्या अधिनियम क्रमांक 54 मधील मुद्दा क्रमांक पाचमध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीकरिता किंवा पोट निवडणुकीकरिता नामनिर्देशन करण्यासाठी निश्चित केलेल्या अंतिम दिनांकास ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच बनू इच्छिणाऱ्या 1 जानेवारी 1995 रोजी जन्मलेल्या अथवा त्यानंतर जन्म असलेल्या उमेदवाराकडे किमान शालेय शिक्षणातील सातवी इयत्तेची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

धुळे, नंदुरबार जिल्‍ह्‍यातील प्रमुख घडामोडी जाणून घेण्यासाठी क्‍लिक करा.

तर ठरणार अपात्र
सरपंच होवू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे सातवी इयत्ता उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र नसल्यास ती व्यक्ती सरपंच बनण्यास पात्र असणार नाही असे नमूद करण्यात आले आहे. त्यातही आयोगाने लक्षात आणून दिले आहे की महाराष्ट्र अधिनियम 2020च्या क्रमांक 2 कलम 13 च्या पोट कलम 2 मध्ये सरपंच या शब्दाऐवजी सदस्य हा शब्द दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे 1 जानेवारी 1995 व त्यानंतर जन्मलेल्यांना सरपंच होण्यासाठी सदस्यांना सातवी पास असणे आवश्यक आहे. 

तर मिळणार दुसऱ्याला संधी
दुसरीकडे आयोगाच्या पत्रानुसार 1 जानेवारी 1995 पूर्वी ज्या व्यक्तींचा जन्म झालेला असेल अशा व्यक्तीबद्दल कोणताही उल्लेख नसल्याने त्यापूर्वी जन्मलेल्या व्यक्तींनाही सरपंच होता येणार आहे. दरम्यान नवीन पिढीत शिक्षणाचे प्रमाण पाहता सातवी पासची समस्या येणार नसल्याचे बोलले जात आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image