
आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाचा शानदार समारोप झाला. आदिवासी कला अकादमीचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, दिग्दर्शक डॉ. आलोक सोनी, श्याम रंजनकर, सुभाष तायडे-पाटील, शुभम अपूर्वा, रोशनी फिल्म फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष तुषार थोरात आदींच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
नंदुरबार : स्प्राउटिंग सीड आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात बेस्ट लघुचित्रपटाचा मान रशियातील ‘मेन डोन्ट क्राय’ या चित्रपटाने पटकावला. तसेच इटली येथील ‘पोस्ची-कव्हर कार्बन’ला बेस्ट लघुपटाने गौरविण्यात आले.
येथील आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाचा शानदार समारोप झाला. आदिवासी कला अकादमीचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, दिग्दर्शक डॉ. आलोक सोनी, श्याम रंजनकर, सुभाष तायडे-पाटील, शुभम अपूर्वा, रोशनी फिल्म फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष तुषार थोरात आदींच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
खासदार डॉ. हीना गावित, राजेंद्रकुमार गावित, दिग्दर्शक आलोक सोनी यांनी मनोगत व्यक्त केले. मानसिंग राजपूत यांनी स्क्रीन उपलब्ध करून दिले. डॉ. सुजित पाटील यांनी प्रास्ताविक केले. जयंत शाह यांनी सूत्रसंचालन केले. डॉ प्रकाश ठाकरे यांनी आभार मानले. डॉ. सी. डी. महाजन, डॉ. राजेश कोळी, डॉ. राजेश वळवी, रणजित राजपूत आदींनी संयोजन केले.
हे ठरले विजेते
बेस्ट लघुचित्रपट म्हणून रशियातील ‘मेन डोन्ट क्राय’, बेस्ट फिचर फिल्म म्हणून बर्किनी फासो येथील ‘ब्रीथलेस’, बेस्ट माहितीपट म्हणून इटली येथील ‘पोस्ची-कव्हर कॉर्बन’, बेस्ट एनिमेशन फिल्म म्हणून ‘ब्रेक द स्टिरियोटाइप’, बेस्ट म्युझिक व्हिडिओ म्हणून ‘लाही लाही’, बेस्ट कोविड-१९ फिल्म म्हणून को-वार, बेस्ट मोबाईल फिल्म म्हणून टाइम आदींच्या दिग्दर्शकांना प्रथम पारितोषिके देण्यात आली. याच प्रकारात द्वितीय व तृतीय असे एकूण ९० पुरस्कारही देण्यात आले. चित्रपट महोत्सवात संवाद नसलेला ‘इनर’ हा लघुचित्रपट प्रेक्षकांना अंतर्मुख करून गेला. चित्रपट महोत्सवासाठी हॉलिवूड अमेरिका, जर्मनी, इराण, कोरिया, बांगलादेश आणि भारतातील बॉलिवूडमधील दिग्गज आंतरराष्ट्रीय पुरस्कारविजेते परीक्षक म्हणून लाभले होते. तसेच ३५ देशांतून ४७१ चित्रपटांचा सहभाग या चित्रपट महोत्सवाने विक्रम केला.
संपादन ः राजेश सोनवणे