esakal | म्‍हणून येतोय नवापूरमध्ये कोरोनाचा आलेख खाली
sakal

बोलून बातमी शोधा

navapur lockdown

म्‍हणून येतोय नवापूरमध्ये कोरोनाचा आलेख खाली

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवापूर (नंदुरबार) : राज्यासह जिल्ह्यात व तालुक्यात कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट आली आहे. कोरोना महामारीची चेन ब्रेक करण्यासाठी शासनाने ‘ब्रेक द चेन’ची (Break the chain) घोषणा केली आहे. ३० एप्रिलपर्यंतची संचारबंदी (Lockdown) आता १५ मेपर्यंत वाढवण्यात आली. या निर्णयाला तालुक्यातील व्यापाऱ्यांकडून चांगला प्रतीसाद मिळत असून ११ वाजताच दूकानाचे शटर बंद करण्यात येत आहेत. संचारबंदीमुळे गर्दीचे प्रमाण खूप कमी होत असुन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा वाढता आलेख आता खाली येत आहे. (coronavirus lockdown merchant follow rules and ratio down this week)

नवापूर तालुक्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत झपाट्याने रुग्ण वाढले. यामुळे तालुका प्रशासन खडबडून जागे झाले. शासनाने ठरवून दिलेल्या ब्रेक द चेनचे सर्व नियम पाळण्यावर भर देत आहेत. नवापूर शहरातील प्रशासन, तालुक्यातील ग्रामपंचायतच्या माध्यमातून, पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने कुठे दंडात्मक कार्यवाही तर कुठे समजावून सांगितले. यामुळे खुप मोठी जन जागृती झाली असल्याने, नागरीक व्यापारी यांनी लॉकडाउनची भुमिका लक्षात घेवून सर्व नियमांचे पालन करीत आहेत.

व्यापाऱ्यांचा अकरा वाजताच बंद

लॉकडाउन पाळण्यासाठी व्यापारी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. यांनी जर चोरून लपून दूकाने चालू ठेवली तर नागरीक ही विनाकारण रस्त्यावर फिरतात. परंतु कृषी, दवाखाने व मेडीकल सोडून सर्व व्यापारी ११ वाजताच दुकाने बंद करीत असल्याने नवापूर शहरासह ग्रामीण भागात शुकशुकाट दिसत आहे.

हेही वाचा: लसी उपलब्ध होताच तोबा गर्दी; पोलिस बंदोबस्त

मग नागरीकही येतात रस्‍त्‍यावर

तालुक्यात करोनाच्या प्रादुर्भावामुळे पन्नासच्यावर लोकांना जिव गमवावा लागला आहे. व्यवसायिकांनी व नागरिकांनी शासनाचे नियम पाळलेले बरे. आज दोन पैशापेक्षा जिव महत्‍त्वाचा असल्याची भुमिका दूका़दारानी घेतली असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. तालुक्यात ११ वाजेच्या नंतर फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतात. यामुळे गर्दीचे प्रमाण कमी झाल्याने मागील काही दिवसापासून तालुक्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या घटली आहे.

हेही वाचा: धुळ्यात दोन लाख नागरिकांचे लसीकरण, प्रतिक्षेत १८ लाख

नवापूर शहरासह तालुक्यात संचारबंदीला सर्व नागरिक सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. शहरात व्यापारी सर्व नियम पाळत असल्याने गर्दी कमी झाली आहे. त्याअनुषंगाने रुग्ण संख्या कमी होत आहे. कोरोना झाल्याने काय होते हे नागरिकांना समजले आहे. नवापूर तालुक्यातील व्यापारी, दुकानदार व नागरिक यांनी असाच सकारात्मक प्रतिसाद देऊन कोरोना महामारीवर विजय मिळवायचा आहे. आपला तालुका कोरोनामुक्त कसा करता येईल यासाठी प्रयत्न करू या.

- शिरीषकुमार नाईक, आमदार

शासनाने पुन्हा १५ मे पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. कोरोना ही एक आपत्ती आहे. पैशापेक्षा जिव महत्वाचा असल्याने ११ वाजेला दुकान बंद करणे आवश्यक आहे. अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, आतापर्यंत जे सहकार्य केले असेच पुढे करावे, कोरोना ला हरवू या.

- मंदार कुलकर्णी, तहसीलदार