esakal | धुळ्यात दोन लाख नागरिकांचे लसीकरण, प्रतिक्षेत १८ लाख
sakal

बोलून बातमी शोधा

धुळ्यात दोन लाख नागरिकांचे लसीकरण, प्रतिक्षेत १८ लाख

धुळ्यात दोन लाख नागरिकांचे लसीकरण, प्रतिक्षेत १८ लाख

sakal_logo
By
निखील सुर्यवंशीधुळे : शहरासह जिल्ह्यात विविध वयोगटातील वीस लाखांपैकी आतापर्यंत दोन लाख नऊ हजार ९० नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक लस (Covid preventive vaccine) घेतली आहे. यात आरोग्य यंत्रणेला (Health systems) बुधवारी (ता.५) नवे २१ हजार डोस प्राप्त झाले आहेत. लसीकरणासाठी धुळे शहरासह जिल्ह्यात एकूण १४३ केंद्र कार्यरत असून साडेतीन हजारांवर कर्मचारी गुंतले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या सीईओ वान्मती सी., नोडल अधिकारी डॉ. शिवचंद्र सांगळे, शहराच्या नोडल अधिकारी डॉ. पल्लवी रवंदळे यांनी दिली.

(dhule district vaccination two lakh citizens)

हेही वाचा: लॉकडाउनच्या काळात ‘मनरेगा’ ठरतेय मजुरांसाठी जीवनदायी

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना त्याच्याशी मुकाबला करण्यासाठी लसीकरण मोहिमेला (Vaccination campaigns) वेग आला आहे. लसीकरण केले आणि नियमांचे पालन केले नाही तर कोरोना होऊ शकतो. मात्र, ऑक्सिजन (Oxygen) , व्हेंटीलेटर (Ventilator) पासून रुग्णाचा बचाव होऊ शकतो. जिवाचे संरक्षण होऊ शकते. त्यामुळे लसीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. या अनुषंगाने कोविशिल्ड (Covishield)आणि कोव्हॅक्सिन (covacin) लस दिली जात आहे. त्याचे नियम आणि निकषांनुसार दोन डोस घ्यावे लागतात. सरकारने १८ व त्यावरील सर्व वयोगटातील नागरिकांना मोफत लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे.

लसीचे वीस लाख लाभार्थी
जिल्ह्यात प्रथम १६ जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, ३ फेब्रुवारीपासून फ्रंट लाईन वर्कर्स, एक एप्रिलपासून ४५ ते ६० आणि एक मार्चपासून १८ व त्यावरील सर्व वयोगटातील नागरिकांना लस देण्यास सुरवात झाली आहे. जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील १२ लाख ३५ हजार, तर ४५ व त्यावरील वयोगटातील ७ लाख २२ हजार ४१५ नागरिक आहेत. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या सुमारे २५ लाख आहे. पैकी १९ लाख ५७ हजार ४१५ नागरिकांचे लसीकरण होणार आहे. पैकी आतापर्यंत दोन लाख नऊ हजार ९० नागरिकांनी लस घेतली आहे. उर्वरित १७ लाख ४८ हजार ३२५ नागरिक लसीकरणाच्या प्रतिक्षेत आहेत.

हेही वाचा: सातपुड्याचा महू वृक्ष कोरोनावर गुणकारी

जिल्ह्यात लसीकरणाची स्थिती
जिल्ह्यास आतापर्यंत कोविशिल्ड लसीचे एक लाख ७१ हजार २०, तर कोव्हॅक्सिन लसीचे ४४ हजार ४५०, असे एकूण दोन लाख १५ हजार ४७० डोस प्राप्त झाले आहेत. यात हजार लसींची मागणी केल्यास हाती दहा लस पडत आहेत. यंत्रणेला बुधवारी कोविशिल्डचे नऊ हजार, तर कोव्हॅक्सिनचे १२ हजार, असे एकूण २१ हजार डोस प्राप्त झाले आहेत. ते सरासरी तीन दिवस पुरतील. यातही कोविशिल्डचा दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांनाच लाभ मिळेल, तर कोव्हॅक्सिनचा १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लाभ दिला जाईल. जिल्ह्यात आतापर्यंत कोविशिल्डचा एक लाख ३६ हजार ४८४ नागरिकांनी पहिला डोस, तर २३ हजार ७४१ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच कोव्हॅक्सिनचा ३४ हजार ८८६ नागरिकांनी पहिला डोस, तर ८ हजार ६८३ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. व्यापक जनजागृतीमुळे लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून रांगा लागत आहेत. गर्दी नियंत्रणासाठी यंत्रणेची कसरत होत आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविली जात आहे.

धुळेकरांच्या लसीकरणाची एकंदर अशी स्थिती...
तालुका/ केंद्र.......पहिला डोस......दुसरा डोस.....पहिला डोस......दुसरा डोस
(कोविशिल्ड) (कोव्हॅक्सिन)

धुळे.................६,१७५..........१४६.............२०,४३०.......४,४३५
साक्री................२२,००५........१,४२१......... ०...............०
शिंदखेडा............१८,३३१.........२,०८२.........०...............०
शिरपूर...............१७,५९२.........२,१२८.........०...............०
जिल्हा रूग्णालय....३४,०८१........१०,८६५......... ६,२९१.......१,१७५
धुळे महापालिका....२६,७४५.........५,१२९...........२,११५.......६१०
खासगी रुग्णालये....११,५८४........१,९७५............६,०५०.......२,४१८
एकूण.................१,३६,४८२.....२३,७४१..........३४,८८६.....८,६३८

(dhule district vaccination two lakh citizens)