रात्रीस खेळ चाले..महाराष्ट्र-गुजरात सीमेवरून शेकडो लक्झरी बसचा प्रवास

रात्रीस खेळ चाले..महाराष्ट्र-गुजरात सीमेवरून शेकडो लक्झरी बसचा प्रवास
maharashtra gujarat border
maharashtra gujarat bordersakal

नंदुरबार : कोरोना संचारबंदी (Corona lockdown) काळात जिल्ह्यात परराज्यातून येणाऱ्या वाहनांना आरटीपीसीआर चाचणी अहवाल बंधनकारक असतानाही महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील नवापूर सीमा (maharashtra gujarat border) तपासणी नाक्यावर कोरोना चाचणी अहवालाची तपासणी न करताच मध्यरात्रीतून शेकडो खासगी लक्झरी बसचा प्रवास सुरू आहे. आरटीओ अधिकाऱ्यांच्या (Nandurbar RTO) आशीर्वादानेच कोरोना नियमांची ऐसी की तैसी करत बिनधास्त हा रात्रीचा खेळ सुरू असल्याचा आरोप होत आहे. मात्र या सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. (luxury buses travel across the maharashtra gujarat border no enforcement of rules)

maharashtra gujarat border
केळीच्या रोपांमध्ये शेतकऱ्‍यांची फसवणूक

आरटीओ अधिकाऱ्यांच्या एजंटमार्फत मध्यरात्रीतून महाराष्ट्र शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवून ग्रामीण भागातील गावांमधून खासगी लक्झरी बस सीमा पास करण्याचे काम सुरू आहे. सोमवारी (ता. १७) रात्री नवापूर तालुक्यातील आमलाण गावातून जाणाऱ्या खासगी लक्झरी बस ग्रामस्थांनी अडवून ठेवत या गावातून गुजरातमधून येणारे प्रवासी वाहतूक होऊ नये, असा हट्ट धरला असताना पोलिसांनी संरक्षण देत या लक्झरी बस तेथून पुढील प्रवासासाठी रवाना केल्या. ग्रामस्‍थांचे म्हणणे योग्य असतानाही नवापूर पोलिसांनी लक्झरीचालकांना अभय देत अवैध प्रवासी वाहतूक नेण्याचे काम केले. त्याचबरोबर नंदुरबार-धुळे जिल्हा सीमावर्ती कोंडाईबारी महामार्ग पोलिस चौकीतून इतर जिल्ह्यांतून येणाऱ्या खासगी प्रवासी बस तपासणी न करता गुजरातमध्ये सोडल्या जात आहेत.

दिवसा निर्बंध अन्‌ रात्री नियम धाब्‍यावर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात गावागावांत कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला हे सर्वश्रुत असताना परराज्यातून येणाऱ्या अवैध खासगी प्रवासी वाहतूकही याला कारणीभूत ठरली आहे. त्यामुळे दिवसा पोलिसांकडून बाजारपेठेत व्यापारी व नागरिकांना कडक निर्बंध लावून त्रास दिला जातो, तर दुसरीकडे मध्यरात्रीतून पोलिस प्रशासनाद्वारे संचारबंदीचे नियम धाब्यावर बसवून परराज्यातून अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याचा आरोप होत आहे. पोलिस प्रशासनाला संचारबंदीत व्यापारी व नागरिकांवर दुजाभाव करायचा असेल तर लॉकडाउनचे नियम बंद करा, अन्यथा भारतीय ट्रायबल पार्टीद्वारे प्रशासनाविरुद्ध राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर रास्ता रोकोचा इशारा भारतीय ट्रायबल पार्टीचे जिल्हाध्यक्ष के. टी. गावित यांनी दिला आहे.

maharashtra gujarat border
पोस्ट, बँका पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी

उत्‍पन्‍नाची चौकशी करावी

नवापूर तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे याबाबत वारंवार तक्रारी देऊनही कारवाई न करता अवैध प्रवासी वाहतूक सुरू ठेवल्याने संबंधित अधिकाऱ्यावरच कारवाई करून सेवेतून कायमचे बडतर्फ करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे उत्पन्नाची चौकशी करावी, अशी मागणीही गावित यांनी केली आहे.

खासगी वाहनांची तपासणी, लक्झरींना सूट

शासन-प्रशासनाने जिल्हाबंदी, विनाकारण प्रवासबंदीचे नियम लावले आहेत. त्याची अंमलबजावणीसाठी चौकाचौकांत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात केला आहे. साध्या दुचाकीने डबलसीट जाणाऱ्या वाहनधारकांना चलन फाडून दंड आकारला जात आहे. असे असताना पोलिसांसमोर लक्झरी बिनधास्त प्रवासी भरून जात असतील व नियमांचे उल्लंघन करीत असतील तर याला काय म्हणावे, असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com