भावाच्या हळदीला पोहोचण्यापूर्वीच बहिणीला काळाने हिरवले

accident
accident

सारंगखेडा (नंदुरबार) : सारंगखेडा येथील महिलेचा आकुलखेडा (ता. चोपडा) येथे दुचाकीवरून पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. सदर महिला चुलत भावाचा हळदीच्या कार्यक्रमाला विरवाडे (ता. चोपडा) येथे दुचाकीवर पती व मुलांसह जात असतांना ही घटना घडली. गावात घटनेची माहीती कळताच भावनाविवश झाले होते.
दोंडाईचा येथून विरवाडे (ता. चोपडा) येथे रिंकू जमादार (वय ३२) यांच्या चुलत भावाचे लग्‍न ५ मार्चला नियोजित आहे. त्‍यानुसार आजच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी रिंकू जमादार या पती अविनाश जमादार व दोन मुलांसह दुचाकीने निघाले होते. भावाच्या लग्‍नासाठी तयारी करून आणि आनंदाने निघालेल्‍या रिंकू यांच्यावर काळाने झडप घातली. या घटनेने लग्‍नसोहळा असलेले विरवाडे येथील कुटूंब दुःखात बुडाले.

कुत्रा आडवा आला अन्‌
दुपारी तीन वाजेच्या सुमारास आकूलखेडा (ता. चोपडा) गावाजवळ आल्‍यानंतर त्‍यांच्या दुचाकीसमोर कुत्रा आल्याने अविनाश यांनी दुचाकीचा ब्रेक लावला. यात रिंकू या दुचाकीवरून खाली पडल्याने त्‍यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेल्‍या पती, मुलांना कोणतीही दुखापत झाली नाही. चोपडा ग्रामीण रुग्णालयात तपासणी करण्यात आली. अत्यंत शोकाकुल वातावरणात सारंगखेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com