शहादा येथे दोन विवाह सोहळ्यांवर कारवाई 

corona marriage
corona marriage

शहादा (नंदुरबार) : शहादा शहरातील दोन मंगल कार्यालयांत वऱ्हाडी मंडळींनी तोंडावर मास्क न लावणे, तसेच ५० पेक्षा जास्त वऱ्हाडी मंडळी लग्नात उपस्थित राहिल्यामुळे शहादा महसूल प्रशासन, पोलिस प्रशासन व नगरपालिका यांच्याकडून दंडात्मक कारवाई करत सुमारे २६ हजार रुपयांच्या दंड आकारला आहे. 
लोणखेडा (ता. शहादा) येथील एका मंगल कार्यालयात रविवारी (ता.२१) लग्न विवाह प्रसंगी वऱ्हाडी मंडळींचा चेहऱ्यावर माक्स न लावणे तसेच बँड पथकाने मास्क न लावल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना ताजी असतानाच सोमवारी शहादा उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घोगरे, शहादा तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत, शहादा नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. राहुल वाघ, गोपनीय शाखेचे युवराज पाटील, मुकेश राठोड यांच्यासह कार्यालयातील प्रशासन वर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारी मिळालेल्या माहितीनुसार लोणखेडा येथील लेवा पाटीदार मंगल कार्यालयात भेट दिली असता लग्न सोहळ्यास ५० पेक्षा जास्त वऱ्हाडी मंडळ आढळल्याने महसूल व पोलिस प्रशासनाकडून या कार्यालयास दहा हजार रुपये दंडात्मक कारवाई केली. त्यानंतर हे भरारी पथक लोणखेडा दोंडाईचा बायपास रस्त्याला लागून असलेल्या केशरानंद मंगल कार्यालयात गेले असता या ठिकाणी देखील ५० पेक्षा जास्त वऱ्हाडी मंडळी तसेच वऱ्हाडी मंडळींच्या तोंडाला मास्क नसणे बॅंड पथकाच्या तोंडावर माक्स नसणे यामुळे या ठिकाणी या मंगल कार्यालयाच्या प्रमुखांवर १६ हजार रुपयाची दंडात्मक कारवाई केली. कोविड-१९ उपाय योजना अंतर्गत विविध सुरक्षा उपाययोजनांचे आदेश दिले असून या आदेशाचे उल्लंघन झाल्याने ही दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती शहादा पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी दिली. 

ासंपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com