तळोदा तालुका परिसरात वादळी वाऱ्यास पाऊस; घरांचे नुकसान

तळोदा तालुका परिसरात वादळी वाऱ्यास पाऊस; घरांचे नुकसान
taloda teavy rain
taloda teavy rainsakal

तळोदा (नंदुरबार) : तळोदा तालुक्यात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी (Heavy rain and strom) लावली. यात तळोदा शहर, भवर, बुधावल, सोमावल, नर्मदानगर, राजविहीर व सिंगपूर या भागात वादळ वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर नर्मदानगर व सिंगपूर येथील घरांवरील पत्रे उडून गेले. त्यामुळे नर्मदानगर येथे ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले. नर्मदानगर भागात पाऊण ते एक तास पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी (Farmer) सुखावला असून कापसाची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना या पावसाने दिलासा दिला आहे. (nandurbar-taloda-taluka-aria-heavy-rain-and-strom-house-damage)

taloda teavy rain
पालक, विद्यार्थी, शिक्षकांची यंदाही ‘ऑनलाइन’तून सुटका नाही

नंदुरबार जिल्ह्यात (Nandurbar district heavy rain) २९ मे ते ५ जून पावेतो वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात २९ मेपासून कुठे ना कुठे पाऊस हजेरी लावत आहे. तळोदा तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून वादळी वाऱ्यासह पाऊस असल्याने भीतीचे वातावरण तयार झाले होते.

घरावरील पत्रे उडाली

तळोदा शहर तसेच बुधावल, भवर, राजविहीर, सोमावल, नर्मदानगर, सिंगपूर या परिसरात पावसाचा जोर अधिक होता. यात परिसरातील अनेक झाडे उन्मळून पडली अथवा झाडांच्या फांद्या तुटून खाली पडल्या होत्या. तर दुसरीकडे नर्मदानगर येथील खेत्या गारग्या वळवी यांच्या घरावरील सिमेंटचे पत्रे उडून त्या पत्र्यांच्या अक्षरशः चुरा झाला. तर सिंगा वेल्या पाडवी यांच्या घरावरील कौले देखील उडाली आहेत. कालुसिंग बोद्या पाडवी, रामा जाग्या पाडवी यांचे देखील घराचे नुकसान झाले आहे. पावसाने हजेरी लावताच तालुक्यात विजेची देखील समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे एक ते दीड तास वीज पुरवठा बंद करण्यात आला होता.

पेरणीची लगबग

पावसामुळे ज्या शेतकऱ्यांनी कापसाची लागवड सुरू केली आहे. अशा शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर मान्सून देखील वेळेवर येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असल्याने तालुक्यात शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामांना वेग दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com