आत्महत्येपासून परावृत्त होऊन निवडला खारी विकण्याचा व्यवसाय

Dinkar Sangamnere
Dinkar Sangamnere

निफाड : महाराष्ट्राचा कॅलीफोर्निया म्हणुन बिरुद मिरवणारा निफाड तालुका सध्या वाढत्या कर्जामुळे सर्वाधिक शेतकरी आत्महत्येचा तालुका म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. अस्मानी सुलतानी संकटांनी शेतीचा डोलारा कोसळत असतानाच खेरवाडी येथील कर्जबाजारी शेतकरी दिनकर संगमनेरे या आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत असलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याने आजपासून आपल्या दुचाकी गाडीवर खारी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. तर भाजीविक्रीच्या क्रेटवर खारी पावाची बेकरी उत्पादने आणि सोबत स्वाभिमानी फेरीवाला नावाचा बोर्ड दुचाकीला लावत कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना आत्महत्येपेक्षा कुटुंबासाठी व्यवसाय करा असा संदेश देत संपूर्ण निफाड तालुक्यातील शेतकरी तरुणांचे ते प्रबोधन करणार आहेत.

गेल्या काही महिन्यापासून निफाड तालुक्यात कर्जबाजारीपणाने दर महिन्यात शेतकरी आत्महत्येच सत्र सुरुच आसताना आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना व्यवसायातून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यानेच आता प्रबोधन करण्याचा विडा उचलला आहे. 
खेरवाडी (ता. निफाड) येथील दिनकर संगमनेरे पती-पत्नी दोन मुले आई असे शेतकरी कुटुंब आपला वडिलोपार्जित साडेतीन एकर जमीन असून त्यात दोन एकर द्राक्ष लागवड केली आहे. तर ते दीड एकर शेतात भाजीपाला पिकवतात मात्र सलग पाच ते सहा वर्षांपासून कधी नैसर्गिक दुष्काळ तर कधी कवडीमोल बाजारभाव यामुळे त्यांच्यावरील कर्ज वाढत गेले. आज विविध कार्यकारी सहकारी सोसायटी साडेतीन लाख, स्थानिक पतसंस्था दोन लाख, सोने तारण दोन लाख, शिवाय पाहुणे, मित्र परिवार, दुकानदार यांचे असे एकूण जवळपास दहा लाख रुपयांचे कर्ज झाले. 

प्रत्येक वर्षी शेती तोट्यात जात असल्याने कर्ज वाढत गेले. आज समाजातील कोणीच जवळ उभे करत नाही, अशा परिस्थितीत केवळ आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नव्हता डोळ्यासमोर सर्व कुटुंब उभे राहायचे. मात्र रात्री झोपताना खूप विचार करून आयुष्य संपविण्यापेक्षा कुटुंब कबिला चालवण्यासाठी लाज न बाळगता आपण गावागावात जाऊन खारी, पाव विक्री करून कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न करावा आत्महत्या केल्यास कुटुंबचे काय होणार? लहान मुलांना कोण सांभाळणार? 
आपण आत्महत्या केली तरी ध्रुतराष्ट्र असलेल्या सरकारी यंत्रणा बदलणार नाही. आपण आपले आयुष्य संपविण्यापेक्षा इतर शेतकऱ्यांना आणि तरुणांना प्रेरणा मिळाली पाहिजे, असे काही तरी करावे या भावनेतून सकाळी उठून खारी विक्री करण्यास सुरुवात केली. गाडीला फ्लेक्स बांधून प्रेरणादायी विचार लिहून आजपासुन जनजागृती सुरु केली आहे. संपूर्ण तालुक्यातील गावागावात जाऊन संदेश देणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com