महापालिकेची शंभर टक्के वसुली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 एप्रिल 2019

नाशिक- मार्च अखेर पर्यंत पालिकेच्या विविध कर विभागाने 114 कोटी रुपये वसुल केली असून यंदा प्रथमचं शंभर कोटींच्या पलिकडे वसुलीचा आकडा पोहोचल्याचे समाधान आहे. परंतू मागील थकबाकी जैसे-थे राहिल्याचे देखील यानिमित्ताने समोर आले आहे. आता मार्च अखेर पर्यंत महापालिकेची मिळकत करावरील थकबाकी 184 कोटी रुपयांच्या वर पोहोचली आहे. 

महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 2018-19 या आर्थिक वर्षासाठी 253 कोटी रुपयांचे उद्दीष्ट निश्‍चित केले होते. त्यात अद्यापही कर लागु नसलेल्या 59 हजार मिळकतींचा समावेश होता. मुंढे यांच्या बदलीनंतर सुधारीत अंदाजपत्रक तयार करण्यात आले त्यात घरपट्टीसाठी 149 कोटींचे उद्दीष्ट निश्‍चित करण्यात आले. त्यानुसार 31 मार्च अखेरपर्यंत पालिकेच्या तिजोरीत 114.30 कोटी रुपये जमा झाले. घरपट्टीत गेल्या वर्षापर्यंत 183.74 कोटी रुपयांची थकबाकी होती. 

Web Title: marathi news 100 percentage revenue