आदित्य ठाकरेंची आज घोटीमध्ये सभा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

नाशिकः युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे गुरुवारी (ता. 10) विधानसभा निवडणूक प्रचारासाठी दौरा सुरू करणार आहेत. पहिल्या दिवशी त्यांच्या शहापूर आणि घोटी येथे सभा होतील. इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार आमदार निर्मला गावित यांच्या मतदारसंघात ही सभा होईल. गुरुवारी सकाळी अकराला घोटी शहरात सिन्नर फाटा येथून रॅली काढण्यात येईल. या रॅलीत पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होतील. ही रॅली घोटीतील मेन रोड, बाजारपेठ यांसह विविध भागातून इंद्रप्रस्थ लॉन्स येथे जाईल. दुपारी एकला इंद्रप्रस्थ लॉन्स येथे आदित्य ठाकरे यांच्या सभेने रॅलीचा समारोप होईल.  
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news aadhitya thakre