आम आदमी पार्टीतर्फे बुधवारी जनआक्रोश आंदोलन

residentional photo
residentional photo

नाशिकः: इंधनाचे वाढलेले दर, महागाई यामुळे नाशिकची जनता प्रचंड होरपळली असल्याने शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी आणि आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी "आम आदमी पार्टी' पक्षाच्यावतीने 24 ऑक्‍टोबर रोजी "जन आक्रोश मोर्चा' चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शहराध्यक्षा ऍड. बंडूनाना डांगे यांनी दिली. 

2014 मध्ये सत्तेत आलेल्या भाजप सरकारने या जनतेला विविध आश्‍वासने दिली मात्र त्याची पूर्तता न करता जनतेची दिशाभूल केली. जनतेच्या हिताच्या दृष्टीने कोणतीच कामे आजही होताना दिसत नाही आहे. महागाई प्रचंड वाढली असून अनेकांच्या हाताला काम देखील नाही. महागाई प्रचंड वाढली असल्याने यावर शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी ह्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यात केंद्र, राज्य आणि जिल्हास्तरावरील मागण्या मांडण्यात येवून भाजपा-सेना शासन हटाव महाराष्ट्र बचाव हा नारा दिला जाणार असल्याचेही डांगे यांनी सांगितले. 
दु

पारी 12 वाजता गोल्फ कल्ब मैदानावरून हा मोर्चा निघेल आणि शालीमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सभा होवून मोर्चाची सांगता होणार आहे. यानंतर जिल्हाधिकारी यांना प्रमुख मागण्यासंदर्भात निवेदन देण्यात येणार आहे. 
राज्याचे प्रमुख नेते सेवानिवृत्त ब्रिगेडिअर सुधीर, सावंत, राज्यसचिव सुभाष तवर या मोर्चात सहभागी होणार आहे. 

यावेळी शहर उपाध्यक्ष जगमेरसिंग खालसा, विकास पाटील, अनिल कौशिक, अलताफ शेख, ऍड. प्रभाकर वायचळे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जास्तीत जास्त नागरिकांनी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com