बीकॉमच्या निकालासंदर्भात अभाविपचे आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जून 2019

नाशिकः अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नाशिक शाखेतर्फे तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या चुकीच्या निकालासंदर्भात तसेच पुणे विद्यापीठाच्या पिईटी या पीएचडीच्या पूर्व परीक्षेसंदर्भात असलेल्या तक्रारींबाबत विद्यापीठाच्या विभागीय उपकेंद्रात आंदोलन केले. 
 

नाशिकः अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नाशिक शाखेतर्फे तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या चुकीच्या निकालासंदर्भात तसेच पुणे विद्यापीठाच्या पिईटी या पीएचडीच्या पूर्व परीक्षेसंदर्भात असलेल्या तक्रारींबाबत विद्यापीठाच्या विभागीय उपकेंद्रात आंदोलन केले. 
 

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तृतीय वर्ष वाणिज्य शाखेचा निकालात बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क या विषयात 52 टक्के विद्यार्थी नापास झाले आहेत. इतक्‍या प्रचंड प्रमाणात विद्यार्थी नापास झाल्यामुळे विद्यापीठाच्या व परीक्षा विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. सदर प्रकारांमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक व मानसिक नुकसान होत आह.े विद्यार्थ्यांचे पूर्ण एक वर्ष या चुकीच्या निकालामुळे वाया जाणार आहे. तरी या विषयाच्या सर्व उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन केले जावे निकाल पुन्हा एकदा लावला जावा अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलनाद्वारे केली आहे. 

   पीएचडीसाठी विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या पिईटी या परीक्षेस अंतिम वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांना बसण्याची तरतूद नसल्यामुळे व अंतिम वर्षाच्या निकाल अद्याप यायचे बाकी असल्यामुळे अनेक विद्यार्थी या परीक्षेस बसू शकणार नाहीत तरी अंतिम वर्षाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सदर परीक्षेस बसण्याची तरतुद विद्यापीठाने करावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी अभाविपचे महानगरमंत्री प्रथमेश नाईक, जिल्हा संयोजक सागर शेलार, दुर्गेश केंगे, अथर्व कुलकर्णी, योगेश्वरी सोनवणे, नितीन पाटील, सौरभ धोत्रे, धनंजय रासकर, गौरी पवार, आदित्य आढाव, रोहित तहाराबादकर, सिद्धेश खैरनार, निकिता घरटे, हेमराज देवरे, आकाश पाटील, यश सोनवणे, नुपुर कुलकर्णी, ऋतुजा काळे आदिंसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस-अभाविपमध्ये शाब्दीक चकमक 
आंदोलन सुरू असताना राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या काही पदाधिकाऱ्यांत शाब्दीक चकमक झाली. आज विद्यापीठात होणाऱ्या मॅनेजमेंट कौन्सिलच्या बैठकीत हा विषय मांडून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन समन्वय डॉ. प्रशांत टोपे यांनी दिल्यानंतर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेण्याची तयारी दर्शवली. यावेळी पोलिसांनी या प्रकारात हस्तक्षेप करुन समस्या सोडविली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news abvp andolan