आधार केंद्राच्या डेटाबेसमध्ये बेकायदेशीर फेरफार, ऑपरेटरवर गुन्हा दाखल 

संदीप मोगल
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

लखमापूर ता:-आधार केंद्रात फिंगरप्रिंट ऐवजी रबरी ठसे वापरून आधार केंद्राच्या डेटाबेस मध्ये माहिती अपलोड केल्याप्रकरणी दिंडोरी तहसील मधील आधार केंद्र  ऑपरेटर वर दिंडोरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे  तहसिल कार्यालयापासून अगदी शंभर ते दिडशे फुटांच्या अंतरावर हे केंद्र कार्यरत होते, त्यामुळे या केंद्राला संबंधीत अधिकाऱ्यांच्या कृपार्शिवादाने चालत होते का, अशी चर्चा दिंडोरी परिसरात सुरु आहे.

बाबत सविस्तर वृत्त असे की दिंडोरी येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात असलेल्या आधार कार्ड केंद्रात स्वतःच्या फिंगरप्रिंट ऐवजी बनावट फिंगरप्रिंट चा रबरी शिक्का तयार करून डेटा बेसला  आव्हान देण्याचे काम ऑपरेटर कैलास धोंडीराम गायकवाड रा मडकीजांब यांनी केले त्यामुळे या केंद्रातून एकाच प्रकारचे थब सर्वांना प्राप्त होत असल्याची माहिती मुंबई येथील आधारच्या मुख्य केंद्रास मिळाली याबाबत येथील अधिकाऱ्यांना शंका आल्याने त्यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती दिली जिल्हाधिकारी कार्यालयाने या घटनेची गंभीर दखल घेत दिंडोरीचे तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी या केंद्रात जाऊन तपासणी केली असता बनावट फिंगर प्रिंट, रबरी शिक्के आढळून आल्याने त्यांनी याबाबत दिंडोरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली दिंडोरी पोलिसांनी याबाबत आधार केंद्रातून बनावट रबरी शिक्के व इतर ऐवज जप्त करीत कैलास गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश बोरसे अधिक तपास करीत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news adhar card center