कृषी पदवीच्या थेट दुसऱ्या वर्षाच्या  प्रवेश अर्जासाठी 20 पर्यत मुदत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

नाशिक, ता. 11 : कृषी तंत्रनिकेतन पदविकाधारकांना कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षातील प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 2018-19 च्या प्रवेशासाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठातंर्गतच्या 93 महाविद्यालयातील 1 हजार 981 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. 20 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्जाची अंतीम मुदत आहे. 

नाशिक, ता. 11 : कृषी तंत्रनिकेतन पदविकाधारकांना कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षातील प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 2018-19 च्या प्रवेशासाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठातंर्गतच्या 93 महाविद्यालयातील 1 हजार 981 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. 20 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्जाची अंतीम मुदत आहे. 

महात्मा फुले (राहुरी), डॉ. पंजाबराव देशमुख (अकोला), वसंतराव नाईक मराठवाडा (परभणी) व डॉ.बाळासाहेब सावंत कोकण (दापोली) या कृषी विद्यापीठातून पदविका अभ्याक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी आहे. त्यासाठी केंद्रीभूत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. अशा विद्यार्थ्याच्या प्रवेशासाठी दुसऱ्या वर्षाच्या 20 टक्‍के अतिरिक्‍त जागा महाविद्यालयात उपलब्ध केल्या आहेत. 

प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे. इच्छुकांना "केटीपीएल'च्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येईल. तसेच परीपूर्ण भरलेला अर्ज पुढील प्रक्रियेसाठी ग्राह्य धरला जाईल. प्रवेश अर्जाची प्रत अथवा इतर कोणतीही कागदपत्रे, टपाल अथवा कुरीअरने पाठवू नये, असेही स्पष्ट केले आहे. संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरल्यानंतर स्वाक्षरी, उमेदवाराचे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र व आवश्‍यक सर्व कागदपत्रांच्या मूळप्रती स्कॅन करून संकेतस्थळावर अपलोड कराव्या लागणार आहेत.

"केपीटीएल' च्या सुविधा केंद्रांवर स्कॅनींगची सुविधा उपलब्ध असून अशा केंद्रांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. कृषी पदविका अभ्यासक्रमात खुल्या प्रवर्गासाठी किमान साठ टक्‍के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे. मागास प्रवर्गासाठी उमेदवार किमान पन्नास टक्‍के गुणांसह उत्तीर्ण झालेला असावा. 

प्रवेशासाठी उपलब्ध जागा 
प्रकार महाविद्यालय संख्या उपलब्ध जागा 
अनुदानित 18 391 
विनाअनुदानित 75 1590 
एकूण 93 1981 

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक 
ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, स्कॅन कागदपत्रे अपलोड करणे ः 10 ते 20 जुलै 
अंतीम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार ः 24 जुलै 
ऑनलाईन तक्रार नोंदणीची अंतीम मुदत ः 25 ते 27 जुलै 
अंतीम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार ः 31 जुलै 
पहिल्या प्रवेश फेरीच्या वाटप यादीची प्रसिद्धी ः 4 ऑगस्ट 
प्रवेश निश्‍चितीची मुदत ः 5 ते 7 ऑगस्ट 
दुसऱ्या प्रवेश फेरीच्या वाटप यादीची प्रसिद्धी ः 10 ऑगस्ट 
प्रवेश निश्‍चितीची मुदत ः 11 ते 13 ऑगस्ट 
जागेवरील प्रवेश फेरीसाठी रिक्‍त जागांचा तपशील ः 14 ऑगस्ट 

 

Web Title: marathi news agriculture admission