बेफिकिर जनतेपुढे प्रशासनाने टेकले गुडघे...अमळनेरची चिंता वाढली 

योगेश महाजन 
शनिवार, 9 मे 2020

अमळनेर : कोरोनाने शहरात हाहाकार माजवला आहे. आज सकाळी 31 नवे रुग्ण आढळले आहेत. अमळनेरने शंभरी गाठली असून, बेफिकीर जनतेपुढे आता प्रशासनानेही गुढगे टेकले आहेत. 
कोरोनाने आता तांबेपुरा, कसाली, मारीमाता मंदिर, कासार गल्ली, अंदारपुरा, सराफ बाजार परिसरातही शिरकाव केल्याने चिंता वाढवली आहे. रुग्णसंख्या 102 झाली असून, कोरोनाला थोपविण्यासाठी प्रशासनापुढे आव्हान उभे ठाकले आहे.

आर्वजून पहा :  जळगावची हवा झाली "शुद्ध' ...प्रदूषण स्तर 50 टक्‍क्‍यांनी घटला !

साळीवाडा, झामी चौक, अमलेश्वर नगर, शाह आलम नगर, बोरसे गल्ली आदी परिसरात कंटेंटमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, कोरोनाने आता सिमा ओलांडली असून शहरात घुसून कहर सुरू केला आहे. प्रशासनही हतबल झाले आहे. 

नागरिकांसाठी धोक्याची घंटा
अमळनेर शहर कोरोना हॉट स्पॉट बनले आहे. बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांमुळे संसर्ग वाढला असून, शंभरी पार केल्याने नागरिकांसाठी धोक्याची घंटा आहे. ज्यांना त्रास जाणवत असेल त्यांनी आजार न लपवता स्वतःहून प्रशासनाला कळवावे. यंत्रणेचा ताण हलका करणे गरजेचे आहे. 

नक्की वाचा :  आमदार झाले पालक...अन्‌ तहसिलदार, प्रांताधिकारांनी धरला अंतरपाठ ! 
 

...तर टळला असता अनर्थ
अमळनेर शहराची आकडेवारी पाहता दोन वेळा जनता कर्फ्यु लावण्यात आला. मात्र, तरीही ठिक ठीकाणी लावण्यात आलेला भाजीपाला बाजार, दूध विक्रेते, बँक परिसरात नागरिकांनी गर्दी केली. मद्याची दुकाने उघडल्यावर तळीरामांच्या लांबच लांब रांगा लागल्या. प्रशासनाने वेळीच यास आळा घातला असता तर हा अनर्थ टळू शकला असता. 

नियमांची हवी कठोर अमलबाजवणी 
कोरोनाने शंभरी गाठूनही नागरिकांना गांभीर्य नाही. काही तरुण विनाकारण रस्त्यांवर फिरताना दिसून येत आहेत. पोलिसांनी अशांवर खाक्या दाखवून 'प्रसाद' देणे गरजेचे आहे. नागरिक काहीही कारण दाखवत घराबाहेर पडतात. पादचारीही जणू सगळे काही आलबेल असल्याचे समजून बिनधास्त  वावरत आहे. प्रत्येक कॉलोनी, गल्ली भागात जवान तैनात करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
 

क्‍लिक कराः जळगाव जिल्ह्यात कोरोनचाचा आलेख वाढताच...20 दिवसांत सव्वाशे पार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner carefree people administration not work