आता यांना ही मिळणार २५ लाखांचे विमा संरक्षण: कार्याध्यक्ष पाटील 

आता यांना ही मिळणार २५ लाखांचे विमा संरक्षण: कार्याध्यक्ष पाटील 

अमळनेर ः अंगणवाडी कर्मचारी, गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना २५ लाखांचे विमा संरक्षण मिळणार आहे. त्यांना एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता मंजूर करण्यात आला असल्याची माहिती राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील यांनी दिली. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना गाव पातळीवर शासन आदेशानुसार बाहेरून आलेल्या व्यक्तींचा सर्व्हे करणे, संशयित आढळल्यास माहिती देणे, स्वच्छता व काळजी घेणे, या प्रकारची कामे देण्यात आली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा न करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मध्यवर्ती सरकारने ५० लाखाचे विमा संरक्षण जाहीर केले.

या विमा संरक्षणापासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वंचित ठेवण्यात आल्याची बाब संघटनेच्या लक्षात आली. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाही विमा संरक्षण देण्यात यावे, अशी आशयाची मागणी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. या पार्श्वभूमीवर काल (ता. ३१) ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रवीण जैन यांनी आदेश काढले आहेत. गाव पातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करणाऱ्या आशा, गटप्रवर्तक, अंगणवाडी कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी हे काम करीत आहेत. म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर या सर्वांना २५ लाखाचे विमा संरक्षण देण्यात यावे. प्रत्येकी एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता द्यावा असेही आदेशात नमूद केले आहे. सदर विमा ९० दिवसांसाठी जिल्हा परिषद स्तरांवर काढावा असे आदेश राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना दिले आहेत. संघटनेला मोठे यश मिळाले आहे. म्हणून आपण संघटित राहून आपल्या शक्ती आणखी एकवटून संघटनेचे हात मजबूत करावेत आणि भूलथापांना बळी पडू नये असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले आहे. या निर्णयाचे संघटनेच्या अध्यक्षा मायाताई परमेश्वर, युवराज बैसाणे, गजानन थळे, दत्ता जगताप, सुमंत कदम, सुधीर परमेश्वर, अमोल बैसाणे आदींनी स्वागत केले आहे 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com