ट्रॅक्‍टरच्या धडकेत परप्रांतीय तरूण ठार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

अमळनेर : पारोळा रस्त्यावरील हेडावे चौफुलीजवळ ट्रॅक्‍टरने धडक दिल्याने दुचाकीस्वार माणिकंठम व्यंकटचलम (वय 28 रा. मद्रास) हा तरूण ठार झाला. ही घटना आज सकाळी सातच्या सुमारास घडली. 

अमळनेर : पारोळा रस्त्यावरील हेडावे चौफुलीजवळ ट्रॅक्‍टरने धडक दिल्याने दुचाकीस्वार माणिकंठम व्यंकटचलम (वय 28 रा. मद्रास) हा तरूण ठार झाला. ही घटना आज सकाळी सातच्या सुमारास घडली. 
पारोळा- अमळनेर रस्त्यावरील हेडावे चौफुलीवर हेडावेकडून अमळनेरकडे पाण्याचा टॅंकर घेऊन येत असलेले ट्रॅक्‍टरने (एमएच12बीए6282) अमळनेरहून पारोळ्याकडे जात असलेला दुचाकीस्वार (एमएच19डीके2363) धडक दिली. यात दुचाकीचालक माणिकंठम व्यंकटचलम यास डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. त्यास त्यास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. माणिकंठम व्यंकटचलम हा परप्रांतीय असून, येथील गुरुकृपा कॉलनीत हल्ली मुक्कामी होता. याप्रकरणी मनोहर रामकृष्ण राजू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलिस ठाण्यात ट्रॅक्‍टर चालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली आहे. सहायक फौजदार सुभाष महाजन तपास करीत आहेत. 

Web Title: marathi news amalner tractor accident