पहिले आंबेडकरी "गझलवेध संमेलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

नाशिकः आंबेडकरवादी गझलकार वामनदादा कर्डक यांच्या गझलांचे देशातील पहिले आंबेडकरवादी गझलवेध संमेलन 17 व 18 फेब्रुवारीला नाशिकमध्ये होणार आहे. लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानतर्फे नाशिक- पुणे महामार्गावरील के. जे. मेहता हायस्कूलमध्ये होणाऱ्या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर असतील. गझल संशोधक डॉ. अजिज नदाफ यांच्या हस्ते उद्‌घाटन होईल. 
संमेलनाचे स्वागताध्यक्ष पाली साहित्याचे अभ्यासक नंदकिशोर साळवे असतील.

उद्‌घाटन सोहळ्याला ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार उत्तम कांबळे, गीतकार हरेंद्र जाधव, प्रदीप आवटे, प्रमोद वाळके, भीमराव शिरसाट यांची उपस्थिती असेल. दरम्यान आंबेडकरवादी गझलवेध, संग्रामपिटक (तिसरी आवृत्ती) या पुस्तकाचे प्रकाशन होईल, असे प्रतिष्ठानचे संस्थापक शरद शेजवळ यांनी सांगितले. संमेलनस्थळाला महाकवी वामनदादा कर्डक आंबेडकरवादी गझल नगरी, जनसाथी समाधान पगारे सभागृह, तसेच राजानंद गडपायले गझल मंच, असे नामकरण करण्यात आले आहे. 
सकाळी साडेदहाच्या उद्‌घाटनानंतर दुपारी दोनला दुसऱ्या सत्रात "आंबेडकरवादी गझलेचा सूर्योदय- वामनदादा' या विषयावर चर्चासत्र, सायंकाळी पाचला सिद्धार्थ भगत यांच्या अध्यक्षतेखाली मुशायरा, तर सायंकाळी सातला औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे समन्वयक डॉ. संजय मोहड यांचे गझलगायन होईल. 
दुसऱ्या दिवशी पाच सत्रे 

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहाला डॉ. कुणाल इंगळे व डॉ. चंद्रकिरण घाटे यांचे गझलगायन, दुपारी बाराला सुदाम सोनुले यांच्या अध्यक्षतेखाली मुशायरा, तर दुपारी अडीचला संजय गोहड यांच्या अध्यक्षतेखाली "आंबेडकरवादी गझलेचे सौंदर्यशास्त्र' हा परिसंवादात, तर दुपारी चारला डॉ. अक्‍बाल मिन्ने यांच्या अध्यक्षतेखाली "आंबेडकरवादी गझलेतील नक्षत्रमुद्रा' हे चर्चासत्र होईल. सायंकाळी सहाला डॉ. यशवंत मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या समारोपाला शाहीर नंदेश उमप, "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने यांची उपस्थिती असेल, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष शरद शेजवळ यांनी दिली. 
 
Web Title: marathi news ambedkari gazalved samelan