अमेरिकेत दर रविवारी भरतेय मराठी शाळा कशी पहा.. 

bhushan pallavi choudhary
bhushan pallavi choudhary

जळगाव : अमेरिकेमधील ओहाव्हो कोलंबस शहरात विनायक पर्वते यांनी "बृहन्‌ महाराष्ट्र मंडळ' या माध्यमातून मराठीसाठी रविवारी शाळा सुरू केली आहे. महाराष्ट्रीयन मुलांना मराठी भाषा यावी, मराठी संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. हे वाढविण्यासाठी त्यांना साथ मिळाली ती भूषण व पल्लवी चौधरी या दाम्पत्याची. मराठी शाळांना घरघर लागलेली असताना अमेरिकन मराठी लोकांना आपली भाषा जपावीशी वाटते हे मोठे काम अमेरिकेत सुरू आहे. यासंबंधीचा प्रवास चौधरी दाम्पत्याने परिवर्तनच्या संवादातून उलगडला. 

मराठी भाषा आणि संस्कृतीच्या जपणुकीबरोबरच मराठीच्या उंची व वृद्धीसाठी संजीवनी फाउंडेशन संचलित परिवर्तन संस्था नियमित कार्यक्रमांचे आयोजन करत असते. यावेळी परिवर्तनाच्या कलावंतांनी संवाद साधत भाषेविषयीच्या कार्याविषयी जाणून घेतले. याप्रसंगी संस्थेच्यावतीने ज्येष्ठ गायिका सुदिप्ता सरकार यांनी महाराष्ट्रातील नाट्यकलेला वाहिलेल्या "रंगवाचा' या प्रसिद्ध नियतकालिकाचा अंक देऊन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील, चित्रकार राजू बाविस्कर, नारायण बाविस्कर, वसंत गायकवाड, होरीलसिंग राजपूत, मंजूषा भिडे, प्रवीण पाटील, डॉ. किशोर पवार, मंगेश कुलकर्णी, मनोज पाटील, शरद पाटील, विनोद पाटील, मोना निंबाळकर, कुणाल चौधरी, नीलिमा जैन, कल्पना जवरे आदी उपस्थित होते. 

120 मुलांना देताय मराठी भाषेचे ज्ञान 
भूषण चौधरी व पल्लवी चौधरी हे जोडपं ओहाव्हो (कोलंबस) येथे राहत आहे. हे दोघे मेकॅनिकल इंजिनिअर असून वीस वर्षांपासून अमेरिकेत राहात असले तरी मनाने मात्र त्यांचे मराठीपण अजूनही जिवंत आहे. मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी अमेरिकेत वास्तव्याला असलेल्या मराठी जणांच्या पुढील पिढीसाठी काहीतरी करता यावे यासाठी ते सतत धडपडत आहेत. ओहाव्हो शहरातील जवळपास 120 मुलांना मराठी भाषेचं ज्ञान देण्याचे काम पल्लवी चौधरी करत आहेत. आपली भाषा ही येणाऱ्या पिढ्यांना बोलता यावी, त्यांना भाषेचे महत्त्व पटवून फक्त बोलता येणं महत्त्वाचं नाही. तर त्यात लेखन, वाचन हेही गरजेचे आहे. यासाठी त्यांची धडपड अमेरिकेत सुरू आहे. 

पर्वते कुटुंबीयांचे समर्पण 
अमेरिकेतील मराठी भाषिकांच्या मुलांसाठी वेगळ्या प्रकारची पुस्तके सोप्या आणि आकर्षक मांडणीत तयार करून भाषेविषयीचे अध्यापन प्रत्येक रविवारी त्या इतर सहकार्यांसोबत करत असतात. अमेरिकेत मराठी शिकवण हे खूप आव्हानात्मक काम आहे. ही भाषा का शिकावी हा प्रश्न मुले करतात. अनेक क्‍लास असतात त्यामधून हा आणखी जास्त खर्च करणे, होमवर्क करणे, परीक्षा देणे या सगळ्यांसाठी वेळ व पैसे या दोन्ही स्तरावर संघर्ष आहे. विनायक पर्वते व गिरिजा पर्वते कुटुंबीय हे पूर्ण समर्पित काम करतात. या शाळेसाठी त्यांनी घर उपलब्ध करून दिले आहे. अमेरिकेत राहून मराठी भाषेचे हे कार्य खूप मोठं आहे. याउलट महाराष्ट्रातील मराठी भाषेची शालेयस्तरावर स्थिती मात्र चिंताजनक आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com