"त्या' खोल्यांच्या चर्चेला उधाण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने गोदावरी नदीपात्रात करण्यात आलेले अतिक्रमणाविरोधात मोहीम राबवून आसाराम बापू आश्रमाने केलेले अतिक्रमण हटविले. त्यावेळी आश्रमाच्या सभामंडपाखाली आणि गोदावरीच्या किनाऱ्यालगत असलेल्या दहा-बारा खोल्या आढळून आल्या असून त्यामागील गुपीताची चर्चा आता शहरभर पसरली आहे.

आश्रमाच्या साधकांकडून सदरच्या खोल्या ध्यानधारणेसाठी वापरत असल्याचा दावा केला जात असला तरी तेथील परिस्थिती पाहता संशय व्यक्त केला जात असून पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी जोर धरते आहे. आसाराम बापू सध्या बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगवास भोगत आहेत. त्यांच्या लीला आणि कारनाम्यांची चर्चा जगजाहीर झालेली असतानाही, त्यांचे साधक मात्र अजूनही त्यांना निर्दोष मानत आहेत. दरम्यान, गंगापूररोड परिसरातील गोदावरी नदीकिनाऱ्यालगत गेल्या कित्येक वर्षांपासून आसाराम बापू आश्रम थाटले.

आश्रमाच्या नावाखाली मोठ्याप्रमाणात अतिक्रमण करण्यात आले. एवढेच नव्हे तर नदीपात्रात बांधकामही केले गेले. हेच अतिक्रमण सोमवारी (ता.21) महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने काढले. सभामंडप पाडण्यात आल्यानंतर, याचखाली व गोदावरीच्या किनाऱ्यालगत 10 ते 12 खोल्या आढळून आल्या आहेत. साधारण: 10बाय ते 15बाय आकाराच्या या खोल्या साधकांना ध्यानधारणा करण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

   तेथील परिस्थिती पाहता या खोल्यांबद्दल अनेकांनी संशय व्यक्त केला आहे. गंगापूर रोड परिसरातच नव्हे तर शहरात या खोल्याच्या गुपीताची चर्चा सुरू झाली आहे. सभामंडपातून ÷अत्यंत चिंचोळ्या मार्गातून या खोल्यांकडे जाण्याचा मार्ग होता. तर गोदाकिनाऱ्याला झाडे लावून त्याआड या खोल्या बांधण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या खोल्यांमध्ये नेमकी कोणती धारणा केली जाते, याची उकल व्हावी अशी मागणी परिसरातून नागरिकांकडून होते आहे. 

Web Title: MARATHI NEWS ASARAM ASHRAM PROBLEM