चंदेरी दुनियेत नाशिकची ओजस्विनीची छाप 

residentional photo
residentional photo

नाशिक : चित्रपट, मालिका यांच्यात अगदी सहज लक्षात येते, लक्ष वेधते ते अभिनेता-अभिनेत्रींचा अभिनय. पण छोट्या-मोठ्या पडद्यावर दृष्य साकारसह अन्य बरीच मंडळी अथ्थक परीश्रम घेत असते. अगदी अल्पावधित सहाय्यक कला दिग्दर्शक (असिस्टंट आर्ट डायरेक्‍टर) म्हणून काम करतांना नाशिकच्या ओजस्विनी राजेश पंडित हिने नावलौकिक मिळविलाय. नववर्षात प्रदर्शित होत असलेल्या विक्रम भट दिग्दर्शित "हॅक्‍ड' या बॉलीवूड चित्रपटातही ती सहाय्यक कला दिग्दर्शकाची जबाबदारीत प्रेक्षकांसमोर येत आहे. 

नाशिकच्या ओजस्विनी पंडितने मविप्र संस्थेच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर येथून बॅचलर्स इन सेट डिझाईन या विषयातून पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. आधीपासून काही तरी मोठे करण्याच्या धडपडीतून तिने शिक्षणानंतर थेट मुंबई गाठले. अन्‌ सीआयडी मालिकेतून आपल्या करीअरला सुरवात केली.

मिर्जापूर वेबशोमध्ये संधी

दोन महिने एंट्रान्सशिप केल्यानंतर लगेचच अभिनेते फरहान अखतर यांच्या एक्‍सल एंटरटेंमेंटमधील "मिर्जापूर' वेबशोमध्ये तिला सुवर्ण संधी मिळाली. सहाय्यक कला दिग्दर्शकाची भुमिका तिने यशस्वीरित्या निभावली. त्यानंतर विक्रम भट यांच्या प्रोडक्‍शनतर्फे जिओवर आलेल्या "ट्‌विस्टेड2' वेबशोमध्येही यशस्वीरित्या जबाबदारी पेलली. इथवर न थांबता तिने रणविर कपुर, अक्षय कुमार अशा दिग्गज कलावंतांचा सहभाग असलेल्या जाहिरातींसाठीही सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून काम पाहिले. 

जिद्द,चिकाटी आणि कामाचा व्याप

तिच्या जिद्द, चिकाटी अन्‌ चांगल्या कामाच्या जोरावर तिला आणखी संधी मिळत गेल्या. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्‍शनच्या आगामी चित्रपट "भुत- द हंटेड शिप' यातही तिने यशस्वीरित्या जबाबदारी पेलली आहे. अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री भुमि पेडनेकर यांनी भुमिका साकारली आहे. नवीन वर्षात जानेवारीमध्ये प्रदर्शित होणाऱ्या विक्रम भट दिग्दर्शित "हॅंक्‍ड'मध्येही तिने सहाय्यक कला दिग्दर्शकाची भुमिका पेलली आहे. या चित्रपटातून हिरा खान बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे. 

सर्वात महत्त्वाची भुमिका कला दिग्दर्शकाचीच 
चित्रपट, मालिकेपासून वेब सिरीज्‌मध्ये कला दिग्दर्शक, सहाय्यक कला दिग्दर्शकाची भुमिका अत्यंत महत्वाची असते. सेट कसा असावा, यासंदर्भात कागदावर नक्षीकाम करण्यासह प्रत्यक्षात सेट उभारण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. इतकेच नव्हे, तर प्रत्यक्ष चित्रीकरणावेळी फ्रेममध्ये काय पाहिजे, काय नसावे याकडेही लक्ष द्यावे लागते. स्टुडिओ तसेच त्याबाहेरील चित्रीकरणावेळीही कठोर मेहनतीला अन्य पर्याय नसतो. 

दिग्गज कलावंतांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली. सिनेसृष्टीत काम करणे नक्‍कीच सोपे नाही. बऱ्याचवेळा स्वत:ला वेळ देण्याची संधी खुप कमी मिळते. पण "रोल, कॅमेरा, ऍक्‍शन'ची चार वर्षात इतकी सवय झाली आहे, की ते सोडून दुसऱ्या क्षेत्रात जाणे मुश्‍कील आहे. करीअर म्हणून संघर्ष असला तरी खुपच अनोखा अनुभव या क्षेत्रात आहे. 
- ओजस्विनी पंडित, 
सहाय्यक कला दिग्दर्शिका. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com