अयोध्या निकालामुळे नाशिकमध्ये साधूमहंताचा जल्लोष,घंटानाद,लाढू वाटप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

नाशिक-०९ः अयोध्येच्या निकालानंतर नाशिकमध्ये साधुमहंतानी जय श्रीरामचा जयघोष करत एकच जल्लोष केला. येथील पंचवटी, तपोवन परिसरातील मंदीर,आखाड्यांमध्ये घंटानाद करण्यात आला. त्यानंतर लाढूचे वाटप केले. साधुमहंतांनी एकमेकांना तसेच भक्तांनी शुभेच्छा दिल्या. महंत भक्तीचरणदास,महंत रामनारायणदास आदींनी बऱ्याच वर्षाच्या संघर्षाला योग्य न्याय मिळाला, अशी प्रतिक्रीया नोंदवत प्रभू रामचंद्राच्या पावन स्पर्शाने पुनित झालेली नाशिक भूमी आहे. त्यामुळे नाशिककरांसाठी हा निकाल तितकाच महत्वाचा आहे,अशी भावना त्यांनी नोंदवली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news ayodhya result