बागलाण पंचायत समितीच्या उपसभापतीपदी राष्ट्रवादी कॉग्रेसचे वसंत पवार यांची निवड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

सटाणा-: बागलाण पंचायत समितीच्या उपसभापतीपदासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी कॉग्रेसचे वसंत पवार यांची आज  निवड झाली. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या ज्योती अहिरे यांचा दहा विरूद्ध चार मतांनी पराभव केला. निवडणूक निर्णय अधिकारी तहसिलदार जितेंद्र इंगळे-पाटील तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे हे होते., सी.पी.अहिरे, मनोज निकम, सागर रोकडे यांनीही मदत केली. पंचायत समितीवर भाजपाची एकहाती सत्ता असतांना राष्ट्रवादी कॉग्रेसने मिळविलेल्या या विजयामुळे येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. 

      बागलाण पंचायत समितीच्या उपसभापती भाजपच्या शितल कोर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी आज पंचायत समिती सभागृहात निवडणूक झाली. अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत भाजपातर्फे ठेंगोडा गणाच्या सदस्या ज्योती अहिरे तर राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे आसखेडा गणाचे सदस्य वसंत पवार यांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी दोन्ही उमेदवारांनी हात उंच करून मतदान घेण्याची मागणी केली. त्यानुसार तहसीलदार इंगळे-पाटील यांनी ही मागणी मान्य करत मतदान प्रक्रिया सुरु केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार श्री.पवार यांच्यासाठी मतदान घेतले असता भाजपच्या सभापती विमल सोनवणे यांच्यासह सदस्य अशोक अहिरे, शीतल कोर, पंडित अहिरे, शिवसेनेचे कान्हू अहिरे असे पाच सदस्य फुटले आणि त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केले. राष्ट्रवादीचे उमेदवार श्री.पवार यांना राष्ट्रवादीच्या वैशाली महाजन, गीता ढूमसे, कॉंग्रेसचे रामदास सूर्यवंशी, संजय जोपळे यांनी मतदान केल्याने ते दहा मतांनी विजयी झाले. तर भाजपच्या उमेदवार ज्योती अहिरे यांना अवघे चार मते मिळाली. त्यांना त्यांच्यासह भाजपचे अतुल अहिरे, मीना सोनवणे, कल्पना सावंत यांची मते मिळाली.

. पवार यांच्या विजयाची घोषणा होताच सभागृहाबाहेर राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष केला. 
दरम्यान, पंचायत समितीवर भाजपाची एकहाती सत्ता असून १४ सदस्यांपैकी ७ सदस्य भाजपकडे आहेत. राष्ट्रवादी कॉग्रेसकडे ३, कॉग्रेसकडे २ तर अपक्ष २ असे संख्याबळ आहे. त्यामुळे उपसभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपाचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र काही नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्याने भाजपाकडे बहुमत असूनही त्यांना निवडणुकीला सामोरे जावे लागले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news baglan upsabhpati nivad