सहा वर्षानंतर बहुळा धरण पुर्ण क्षमतेने भरले 

राजेंद्र पाटील
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

नांद्रा (ता. पाचोरा) ः वेरुळी (ता.पाचोरा) येथील पाचोरा तालुक्‍याची संजीवनी असलेल्या बहूळा धरणातून रात्री एक वाजेपासुन साडेसहासे क्‍विसेक्‍स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. हे धरण 2012- 13 नंतर म्हणजे सहा वर्षानंतर प्रथमच पुर्ण क्षमतेने भरले आहे. 

बहुळा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. बहूळा धरण 85 टक्‍के भरले आहे. 15 सप्टेंबरनंतर शंभर टक्‍के जलसाठा ठेवता येतो. परंतु उगमस्थानावर जोरदार पाऊस झाल्यामुळे धरणात पाण्याची पातळी वाढण्यास सुरवात झाली. वेरुळी खु व वेरुळी बु. या गावांना जोडणाऱ्या पुलावरुन पाणी वाहत आहे. प्रशासनाने रात्रीपासून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे बहूळा मध्यम प्रकल्प वेरुळीचे शाखा अभियंता राहूल मोरे यांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bahula dam water haevy rain