क्‍लेरिंग हाऊसवर 200 कोटींचा व्यवहार ठप्प 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

नाशिक : प्रस्तावित राष्ट्रीयकृत बॅंकांच्या विलिनीकरणाविरोधात पुकारण्यात आलेल्या बॅंक कर्मचारी, अधिकारी संघटनांच्या संपामुळे जिल्ह्यातील क्‍लेरिंग हाऊसचे सुमारे 200 कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. संपासंदर्भात आज बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या शहर शाखेसमोर संपात सहभागी 9 बॅंकांच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र शासनाविरोधात निदर्शने करीत घोषणाबाजी केली. 

नेहरू उद्यानासमोरील बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या शहर शाखेसमोर आज सकाळी द्वारसभा झाली. बॅंक ऑफ बडोदा, विजया बॅंक आणि देना बॅंक यांच्या विलिनीकरणाच्या प्रस्तावाविरोधात आज देशभरातील बॅंक कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या 9 संघटना युनायटेड फोरमच्या माध्यमातून एक दिवसीय संपात सहभागी झाल्या आहेत
 
Web Title: marathi news BANK STRIKE